भाजपच्या ‘या’ मंत्र्यानी शिवकाळातील सरसेनापतीच्या कुटुंबातील महिलेला पाठवले विवस्त्र फोटो!

BJP Leader Murder

Maharashtra l धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महायुतीतील अन्य मंत्र्यांवरही विरोधकांनी निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी एका महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा धक्कादायक दावा राऊतांनी केला आहे. या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

जयकुमार गोरे यांच्यावर काय आरोप? :

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या मते, गोरे यांनी एका प्रतिष्ठित घराण्यातील महिलेला विवस्त्र फोटो पाठवले. ही महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील असल्याचे राऊत यांनी सांगितले. विशेष म्हणजे, ही महिला लवकरच विधानभवनाबाहेर उपोषणाला बसणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राऊत यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केला. “महायुतीतील मंत्र्यांची वर्तनशैली संशयास्पद आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, आता माणिकराव कोकाटेंचाही होणार का? मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांची फेरतपासणी केली पाहिजे,” असे ते म्हणाले.

Maharashtra l फडणवीसांची मंत्र्यांना कठोर सूचना :

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या दिवशीच देवेंद्र फडणवीस यांनी भाजप मंत्र्यांना कडक इशारा दिला होता. मंत्र्यांनी सार्वजनिक वर्तनावर नियंत्रण ठेवावे, चुकीचे वर्तन केल्यास मंत्रिपद धोक्यात येईल, अशा स्पष्ट सूचना फडणवीस यांनी दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहेत.

या प्रकरणावर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. जयकुमार गोरे यांच्यावर केलेले आरोप कितपत सत्य आहेत, याबाबत तपास होण्याची शक्यता आहे. मात्र, यामुळे महायुती सरकारसाठी नवा पेच निर्माण झाला आहे.

News title : Sanjay raut Serious Allegations on Jayakumar Gore  

 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .