Sanjay Raut | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आता अगदी तोंडावर आल्या आहेत. येत्या 20 तारखेला मतदार पार पडणार आहे. मतदानासाठी काहीच दिवस शिल्लक असल्याने राज्यभर नेते मंडळींच्या सभा गाजत आहेत. नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची एक सभा नाशिकच्या वणीमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र, वणीमधील हेलिपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील बॅग तपासण्यात आल्या. (Sanjay Raut )
यावरून ठाकरे गटाकडून संताप व्यक्त केला जातोय. यावरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही संतापले आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी संजय राऊत यांनी एक खळबळजनक आरोपही केला आहे. यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.
संजय राऊत संतापले
“उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्याला आमचा आक्षेप नाही. निवडणूक आयोगाने सर्वांना समान न्यायाने वागवायला पाहिजे”, असं राऊत म्हणाले. पुढे त्यांनी एकनाथ शिंदेंच्या सर्व उमेदवारांना आतापर्यंत 25 कोटी रुपये पोहोचले असल्याचा दावा देखील केला.
काही नाक्यांवर सांगोल्यावर पैसे पकडण्यात आले. येथे 15 कोटी रुपये पकडले गेले. पण, गाडी नेमकी कुणाची होती काही सांगितलं का?, गाडी कोणाची आम्हाला माहिती आहे. 15 कोटी पकडले आणि रेकॉर्डवर फक्त 5 कोटी दाखवले. 10 कोटींचा हिशोब कुठे? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केलाय. आज ते माध्यमांशी संवाद साधत होते. (Sanjay Raut )
“..मग मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या बॅगा तपासणार का?
“उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासायला आमचा विरोध नाही. निवडणूक आयोगाने सर्वांना समान न्यायाने वागवायला पाहिजे. मग मुख्यमंत्री, गृहमंत्री कोणीही असतील तरी… पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातून इतक्या बॅगा उतरतात त्या कसल्या असतात? लोकसभेवेळी मी स्वतः एक व्हिडीओ केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका तासासाठी नाशिकमध्ये गेले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरमधून 15 ते 16 बॅगा उतरल्या होत्या. एक तासासाठी इतके कपडे माणूस घेऊन जातो का?”, असा सवाल करत राऊत (Sanjay Raut ) यांनी टीका केली आहे.
तुम्ही आमच्या तपासण्या करता, मग यांच्या कोणी करायच्या. करणार आहात की नाही. यंत्रणा विकत घेतली गेली का? खोके तुम्हालाही पोहोचलेत का?, असा संताप खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय.
News Title – Sanjay Raut Serious allegations on shinde group
महत्त्वाच्या बातम्या-
अजितदादांची चिंता वाढली, भाजपच्या बड्या नेत्याचा घड्याळाविरोधात प्रचाराचा इशारा
गुड न्यूज! सोने-चांदीत मोठी घसरण, जाणून घ्या आजच्या किंमती
“आम्ही गांXची अवलाद नाही, कार्यकर्त्याला हात लावला तर..”; ‘या’ नेत्याचा गुलाबराव पाटलांना इशारा
आज कार्तिकी एकादशी, विष्णु देव ‘या’ राशींच्या मनोकामना पूर्ण करणार!
मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुलगा वयाच्या 12 व्या वर्षापासून ड्रग्सच्या विळख्यात!