बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यन खान प्रकरणात खळबळ माजवणारा तो व्हिडीओ संजय राऊतांकडून शेअर

मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे राज्यातील वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. सीबीआय, ईडी, एनसीबी, आयकर विभाग सध्या राज्यभर कारवाई करत आहेत. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणाला तर आता राजकीय वळण आलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ टाकला आहे. याची राज्यभर जोरदार चर्चा आहे.

आर्यन खानला क्रुझवरून ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलं होतं. तेव्हापासून एनसीबीच्या कारवाईवर राज्यसरकारनं अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित केले होते. आता खुद्द या प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साईलनं समीर वानखेडे लाच मागत असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. यावर आता संजय राऊत यांनी आर्यन खानला अटक केल्यानंतरचा एनसीबीच्या ऑफिसमधील एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

संजय राऊत यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. काही दिवसांपुर्वी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, एनसीबीची कारवाई महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी रचलेलं षडयंत्र आहे. महाराष्ट्र पोलिसांनी स्वत:हून या प्रकरणाची दखल घेत तपास करण्याचं आवाहन सुद्धा संजय राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान, आर्यन खान प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य पोलीस दल यांच्यात आता तपास करण्यावरून चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ – 

थोडक्याता बातम्या 

आर्यन खान प्रकरणाला नवं वळण, एनसीबी पंचानेच केले समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

माही ‘हा’ सामना नको जिंकू म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या तरूणीला धोनीचं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ

कांदा व्यापाऱ्यांकडे सापडलं 100 कोटींचं घबाड; नोटा मोजायला लागला ‘इतका’ वेळ

आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा मोठा गोंधळ, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्याच नाही

‘या’ रेल्वे स्थानकावर 55 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासनाची झोप उडाली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More