बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का- नाना पटोले

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून ठाकरे सरकार आणि विरोधी पक्षामध्ये वाद चालू आहे. मात्र अशातच शिवसनेचे नेते, खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये बोलताना, युपीए विकलांग झाली असून त्याचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्यानं करावं ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावरून नाना पटोलेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

युपीएचं नेतृत्व कोणी करावं हे युपीएच्या सदस्यांनी ठरवलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का, असा उल्लेख केला होता. ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यावर संजय राऊतांनी चर्चा करु नये. इतकाच आमचा सल्ला आहे. संजय राऊत हे युपीएचे सदस्य नाहीत. त्यांना राष्ट्रवादी पक्षाने प्रवक्ता केलं आहे का? हे आम्हाला समजल्यावर आम्ही उत्तर देऊ, असं म्हणत नाना पटोलेंनी राऊतांना टोला हाणला.

महाविकास आघाडी सरकार पहिल्यापासूनच एकजूट आहे. हे सरकार पाच वर्ष चालणार. जे काही सध्या आरोप केले जात आहेत. त्याला उत्तर देण्याची योग्य वेळ महाविकास आघाडीने ठरवली आहे, त्यामुळे आता त्यांच्या उत्तराची सुरुवात झालेली आहे, असंही पटोले म्हणाले.

दरम्यान, संयुक्त पुरोगामी आघाडी अधिक सशक्त करण्यासाठी काँग्रेस पक्षापेक्षा वेगळा नेता हवा आहे. त्यामुळे मी नेहमी शरद पवार यांचे नाव घेत राहील आणि माझी मागणी नेहमी राहिल, असं संजय राऊत म्हणाले होते.

 

थोडक्यात बातम्या- 

मुकेश अंबानींच्या घराजवळ स्काॅर्पिओनंतर त्याच ठिकाणी दुचाकी सापडल्यानं खळबळ

मनसुख हिरेन यांचा सचिन वाझेंच्या गाडीत बसतानाचा व्हिडीओ आला समोर, पाहा व्हिडीओ

रश्मी शुक्लांनी भाजपमध्ये राहण्यासाठी ‘या’ आमदारावर आणला दबाव; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

विमाधारकांसाठी आनंदाची बातमी; अटी पूर्ण होत नसतील तर ‘या’ कालावधीत करू शकता पॉलिसी रद्द

अकोल्यात चक्क बकऱ्यांची बँक! ‘गोट बँक ऑफ कारखेडा’ या बँकेचं काम जाणून घ्या तूम्हीही व्हाल थक्क

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More