मुंबई | विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलीये.
प्रविण दरेकर म्हणाले, “संजय राऊत यांची वक्तव्यं बेताल तसंच बेजबाबदार आहेत. आज त्यांनी सरळ न्यायालयाने काय केलं पाहिजे हे ते सांगितलं. त्यामुळे राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी.”
ते पुढे म्हणाले, “कोर्टावर अशा पद्धतीचं भाष्य करणं हा कोर्टाचा अवमान आहे. सर्वोच्च न्यायव्यवस्था असताना त्यांच्यावरच अशा प्रकारचे आरोप करणं चूक आहे. यासाठीच संजय राऊत यांच्यावक कारवाई करावी अशी ही मागणी आहे.”
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत कोर्टाने दिलेल्या निर्णयावर संजय राऊत यांनी टीका केली. दरम्यान कोर्टाचा हा निर्णय दुर्देवी असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय.
थोडक्यात बातम्या-
‘ही’ माझी वैयक्तिक भूमिका; महाविकास आघाडीची नाही- अजित पवार
ब्रेकिंग न्यूज, बार्किंग न्यूज होता कामा नये- उद्धव ठाकरे
‘अहंकाराचा प्रश्न न करता आरेत काम सुरू करावं’, असं म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचं उत्तर
…तर लग्नाचं वचन देऊन केलेलं सेक्स म्हणजे बलात्कार असं नाही- उच्च न्यायालय
येतो तो शुरू होते ही खतम हो गया! कसोटीत पहिल्याच षटकात शून्यावर पृथ्वी शॉ झाला बाद; पाहा व्हिडीओ