बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राऊतांनी फडणवीसांची काळजी करण्यापेक्षा शिवसेनेची करावी”

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं आरक्षण रद्द केल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झालं आहे. दररोज सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची खेळी रंगलेली पाहायला मिळत आहे. तसेच भाजपने ओबीसींचं आरक्षण मिळवून देण्यासाठी चक्का जाम आंदोलन केलं होतं.

त्यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण मिळवून दिलं नाहीतर, राजकीय संन्यास घेईल, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काळजी व्यक्त करत, आम्ही फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही, असं म्हटलं होतं. यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी, असा सल्ला दरेकरांनी राऊतांना दिला आहे. यासंदर्भात दरेकरांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे.

तसेच संजय राऊत शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचीच जास्त चिंता करत आहेत. त्यांच्या राष्ट्रवादीची चिंता करण्याच्याच धोरणामुळे शिवसेनेत नाराजी आणि अस्वस्थता असल्याचं प्रविण दरेकरांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘ओबीसी असल्याने मला  महसूल खातं मिळालं नाही’; वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर थोरात म्हणाले….

“संजय राऊतसारख्या भाटाची धनगर समाजाला आवश्यकता नाही”

‘… तो वाघच नसतो त्याला पालतू कुत्रा म्हणतात’; नितेश राणे

डेल्टा प्लस व्हेरिएंटची चिंता करू नका; CSIR शास्त्रज्ञांनी केला मोठा खुलासा, म्हणतात…

‘तुझ्यात जीव रंगला’ मधील वहिणीसाहेबांच्या बाळाचा चेहरा अन् नाव आलं समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More