बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावं, ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणं हे बरं नाही- संजय राऊत

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे. तसेच याप्रकरणावरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलेच ताशेरे आढले आहेत.

अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावं. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणं आणि चौकशांचे जाहीर आदेश देणं बरं नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असं वर्तन गृहमंत्र्यांचं असायला हवं, असं म्हणत संजय राऊतांनी अनिल देशमुखांवर निशाणा साधला आहे. तसेच पोलीस खात्याचं नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसतं. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असतं. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसं चालेल?, असं राऊत म्हणाले.

सचिन वाझे हे आता रहस्यमय प्रकरण झाले. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका आणि भरवशाचा असा हा वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खऱ्या चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी?, असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय.

दरम्यान, अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळालं. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिलं, असंही संजय राऊतांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“…म्हणून शरद पवारांनी अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद सोपवलं”

‘आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली’; दिपाली यांचं पतीला लिहिलेलं भावनिक पत्र व्हायरल

जीवाभावाच्या मित्राची दगडाने ठेचून केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

…तर आम्ही रश्मी शुक्ला यांच्यासोबत आहोत- प्रणिती शिंदे

‘हा’ कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे- देवेंद्र फडणवीस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More