महाराष्ट्र मुंबई

“मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला?”

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा संजय राऊत यांना ईडीने नोटीस बजावलेली आहे. यानंतर राज्यात ईडीच्या नोटीशीवरून राजकारण पेटताना दिसत आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली आहे.

सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचे अधःपतन सध्या जोरात सुरू आहे; पण यावर भाजपचे म्हणणे असे की, काँग्रेसच्या काळात ईडीचा गैरवापर झाला नाही काय? व्वा! काय म्हणायचे या अक्कलशून्य मंडळींना! काँग्रेसने कधीकाळी चुकीचे वर्तन केले म्हणून आम्हालाही अंगास शेण फासण्याचा व शेण खाऊन थयथयाट करण्याचा अधिकार आहे असेच ते म्हणतात. मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला?, असा सवाल राऊतांनी केलाय.

‘ईडी’ वगैरेचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडलं पाहिजे. डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.

ईडीच्या वतीने भाजप कार्यालयात हजारेक नोटिसा जणू छापूनच ठेवल्या आहेत व कोणी सत्य बोलू लागले की, त्याच्या नावावर ती नोटीस पाठवून द्यायची, असा एक जोडधंदा सध्या सुरू आहे, अशी टीका राऊतांनी केलीये.

थोडक्यात बातम्या-

“डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य”

राष्ट्रवादी युवक अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, अजूनही अटक का नाही?- चित्रा वाघ

नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का, इतके नगरसेवक हाती शिवबंधन बांधणार

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने पुन्हा धाडले समन्स

बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे; उर्मिला मातोंडकरांचा कंगणाला अप्रत्यक्ष टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या