Top News महाराष्ट्र मुंबई

“मोदींनी वर्क फ्रॉम होम करायला सांगितलंय म्हणून मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम करतायेत”

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चाललेली असताना गेल्या दोन महिन्यांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्यक्षात बाहेर जाऊन परिस्थितीची पाहणी का करत नाहीत, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातोय? विरोधकांच्या याच टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सांगितले आहे ‘वर्क फ्रॉम होम’ करायचे, म्हणून मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम करत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे. मुख्यमंत्री घराबाहेर पडतायेत. वर्षा, सह्याद्री, मातोश्री या सगळ्या ठिकाणाहून ते काम करत आहेत पण हे मात्र विरोधी पक्षाला दिसणार नाही, असा निशाणा त्यांनी भाजपवर साधला आहे.

नरेंद्र मोदी हे सुद्धा घराबाहेर न पडता काम करत आहेत. गृहमंत्री अमित शहा देखील गेल्या कित्येक दिवसांपासून दिसले नाहीत. त्यांना महाराष्ट्रातला विरोधी पक्ष का विचारत नाही, असंही राऊत म्हणाले.

शिक्षण, उद्योग, अर्थव्यवस्था या क्षेत्रातील अपडेट्स आणि नवीन योजनांच्या बाबतीत मुख्यमंत्री तज्ज्ञांसोबत चर्चा करतात. सरकारी कामकाजाबाबतही महत्त्वाच्या बैठकांचे सत्र सुरू असते. विरोधी पक्षाने त्यांच्या चष्म्याचा नंबर बदलून घ्यावा आणि महाारष्ट्र सरकार करत असलेलं काम उघड्या डोळ्यांनी बघावं, असं राऊत म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

शाळा कधी सुरू होणार?, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली तारीख

राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

पुणे महापौरांच्या पायाला भिंगरी, कंटेन्मेंट भागात प्रत्यक्ष भेटी देऊन उपाययोजनांचे नियोजन!

…म्हणून सोलापूर महापालिका आयुक्त दिपक तावरे यांची बदली, त्यांच्या जागी या अधिकाऱ्याची वर्णी

ही 13 शहरं अजूनही बंदिस्त राहणार, बाकीकडे लॉकडाऊन शिथील होणार…!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या