“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही, उलट केंद्र सरकारच बरखास्त करा”
मुंबई | केंद्रीय तपासयंत्रणांचे अधिकारी ढगातून खाली पडलेत का? आमच्या अधिकाऱ्यांना तपास करता येत नाही का? केंद्र सरकारने महाराष्ट्रात ईडी किंवा कोणतीही यंत्रणा आणून तपास केला तरी आम्हाला फरक पडत नाही. महाविकासआघाडी सरकार हे भक्कम आहे, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यातील विरोधी पक्ष परमबीर सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सरकारची प्रतिमा मलीन करायचा प्रयत्न करत आहे. त्यांनी कितीही आरोप केले तरी सरकराच्या प्रतिमेला तडे जाणार नाहीत. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांना महाराष्ट्रात घुसवून महाराष्ट्राच्या स्वायत्तेवर घाला घालत आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
विरोधी पक्ष परमबीर सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन स्वत:ला खूप हुशार समजत आहे. मात्र, हे प्रकरण त्यांच्यावर बुमरँग होईल, असा इशारा संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना दिला आहे.
याप्रकरणात चौकशी करून गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही, हा निर्णय घेतला पाहिजे, या भूमिकेत चूक काय आहे. केंद्रातील अनेक मंत्र्यांवरही आरोप आहेत. विरोधी पक्षाच्या मागणीनुसार सगळ्यांचेच राजीनामे घेतले तर सरकार कसे चालवणार, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच भाजपने केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न केला. उलट केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
माही रिटन्स! मैदानावर येताच धोनीनं टोलवला 114 मीटरचा सिक्स; पाहा व्हिडीओ
धक्कादायक! गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ‘या’ महिलेनं केली तक्रार दाखल
महिलेचा मोदींसोबत फोटो छापून आला, वास्तव समोर आल्यावर उडाली खळबळ
मोठी बातमी : 100 कोटी प्रकरणात आता ‘ईडी’ची एन्ट्री?
…म्हणून या जोडप्यानं नव्या शेजाऱ्यांना वाटली चक्क मोफत बीअर!
Comments are closed.