मुंबई | शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावला आहे. यानंतर राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
भाजपला रोखणाऱ्या नेत्यांना त्रास देण्यासाठी कागदाचे तुकडे पाठवले जात आहेत. गेल्या वर्षभरात मी पाहतोय, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक, माझ्या नावाचा तुम्ही गजर करताय कालपासून यांना सातत्याने जे प्रमुख लोक आहेत, जे हे सरकार बनवण्यात आग्रही होते, राजकीय दृष्ट्या ते दबावाला बळी पडत नाहीत, तेव्हा हे अशा नोटीसा पाठवल्या जातात, असं संजय राऊत म्हणाले.
कालच मी देवेंद्र फडणवीसांचं ऐतिहासिक विधान ऐकलं, काही केलं नसेल तर घाबरायचं कशाला? नोटीस म्हणजे काय ब्रह्मवाक्य आहे का? मी परत सांगतो, आमच्यातील कुणी काहीही केलं नाही, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, आम्ही कोणत्याही नोटिशीला घाबरत नाही, नोटीसला उत्तर दिलं जाईल, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
‘चोरी केली तर हिशोब द्यावाच लागेल’; किरीट सोमय्यांचं राऊतांवर टीकास्त्र
ईडीची कारवाई राजकीय हेतूने, आम्ही कुणालाही घाबरत नाही- आदित्य ठाकरे
पुणे भाजपचा ‘हा’ बडा नगरसेवक अजित पवारांना भेटला; चर्चांना जोरदार उधाण!
“ईडीची नोटीस येणं स्वस्त झालंय, आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातात”
कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय- संजय राऊत