महाराष्ट्र मुंबई

“आता भाजप का गप्प आहे?, राष्ट्रीय सुरक्षा इतकी स्वस्त आहे का?”

मुंबई | पत्रकार अर्णब गोस्वामी आणि BARCच्या माजी CEO च्या कथीत चॅट प्रकरणावरुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या विषय आहे. देशात आम्ही सत्तेत असतो आणि भाजप विरोधी पक्षात तर देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर त्यांनी आतापर्यंत तांडव केलं असतं. प्रधानमंत्री कार्यालयावर मोर्चे काढले असते, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

आज भाजप का गप्प आहे? राष्ट्रीय सुरक्षा इतकी स्वस्त आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

अर्णब गोस्वामी कुठे आहेत हे भाजपला माहीत असेल. कारण देश त्यांच्या ताब्यात आहे. मुंबई पोलीस योग्य वेळी तपास करतीलच. ण ते कुठे आहेत, काय करीत आहेत याची माहिती भाजपला असावी, असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

अरे काय चाललंय काय?, महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?- चंद्रकांत पाटील

“विरोधी पक्षाने मुद्दा उचलल्याने मला वाटलं की मी मोठ्या राजकीय षडयंत्राचा बळी होत आहे”

सीरमला लागलेल्या आगीत एक हजार कोटींचं नुकसान झालं- आदर पुनावाला

‘…तर काँग्रेस पुढच्या वेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही’; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य

सीरमच्या आगीमागे घातपात होता की अपघात हे चौकशीनंतर कळेल- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या