बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विरोधकांचा कोथळा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं, महाराष्ट्रातही तसंच होईल”

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांनाही विरोधक होते. अफजल खान, शाहिस्ते खान होता. पण तरीही शिवाजी महाराज खचले नाहीत. सगळ्यांचा कोथडा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं. महाराष्ट्रातही तसंच होईल, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.

संजय राऊत मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. तसेच यावेळी संजय राऊतांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

शिवाजी महाराजांकडून संपूर्ण देश खरी प्रेरणा घेतोय. आपण त्यांना हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणतो. निश्चयाचा महामेरू म्हणतो, महाराष्ट्राला इतिहास आहे, इतरांना भूगोल असेल… अशा शिवाजींचा जन्म इथे झाला हे महत्वाचं… ज्या शिवाजींच्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असं संजय राऊत म्हणाले.

न्याय कसा असावा हे सैन्याला शिवाजी महाराजांनी सांगितलं. आज शेतकऱ्यांच्या पोटाला, देठाला, अस्तित्वाला धक्का लागतोय, ही परिस्थिती विकट आहे, असं संजय राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

शिवजयंतीवर बंधनं घालायला ही काय मोगलाई आहे काय?- देवेंद्र फडणवीस

सनरुफ उघडून नाचत होती नवरी, तेवढ्यात घडला काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, पाहा व्हिडीओ

पूजा राठोडचा गर्भपात झाला तेथील विभाग-प्रमुख होते रजेवर, गूढ आणखी वाढलं!

“उन्नाव पीडितेला एअरलिफ्ट करून मुंबईत पाठवा, आम्ही तिला उत्तम उपचार देऊ”

पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More