बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भगव्या-भगव्यात आणि रक्ता-रक्तात फरक करणारं मानवी मन गमतीचं; राऊतांचा भाजपवर निशाणा

मुंबई |  महाराष्ट्रात पालघर हत्येवरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार निशाणा साधत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती तर मुख्यमंत्र्यांचं राज्यावर नियंत्रण नाही तसंच कायद्याचा धाक राज्यात राहिलेला नाही, अशी टीका केली होती. त्यानंतर लगोलग एक आठवड्यात अशीच दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. या घटनेनंतर शिवसेनेने झाल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करत भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रात एखादी दुर्घटना घडली की, चिंतेचा माहोल निर्माण केला जातो किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उभा केला जातो, पण भाजपशासित राज्यात भगवी वस्त्र रक्ताने लथपथ झाली तरी चिंतेची शिंकही कुणी मारायची नाही. भगव्या-भगव्यात व रक्ता-रक्तात फरक करणारे हे मानवी मन गमतीचेच आहे, असे आम्ही म्हणतो ते यासाठीच… असं जोरदार प्रत्युत्तर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपला देण्यात आलं आहे.

प्रसंग महाराष्ट्रात घडो वा उत्तर प्रदेशात अशी वेळ राजकारण करण्याची नसून गुन्हेगारांना एकत्रित येऊन धडा शिकविण्याची आहे. आम्ही तुमच्यासोबतच आहोत, गुन्हेगारांना कठोर शासन तुम्ही करालच, असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना एका कळकळीने सांगितले. संपूर्ण महाराष्ट्राची हीच भावना आहे. यात कसले आलेय डोंबलाचे राजकारण! असा टोलाही भाजपला लगावण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात विरोधी पक्ष जो थयथयाट करत आहे त्यातून त्यांचंच हसं होत आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. तसंच कोरोनाच्या या कठीण काळात राजकारण बाजूला ठेवण्याचा सल्ला देखील त्यांनी विरोधी पक्षाला दिला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची तब्येत बिघडली; मुंबईतील रूग्णालयात दाखल

या तारखेनंतर राज्यात एकही कोरोनाचा रूग्ण मिळणार नाही; पाहा कुणी केलाय हा दावा

महत्वाच्या बातम्या-

‘व्हाइट हाउस’ने पंतप्रधान मोदींना अचानक केलं ‘अनफॉलो’ यावर राहुल गांधी म्हणाले…

भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावायची आहे, त्यासाठीच त्यांचा खटाटोप सुरू आहे- जयंत पाटील

…जर हे नाही झालं तर मला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More