“राज्यपालांना शिव्या द्या, आम्ही तुमच्यावर फुलं उधळू”

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. सहकुटुंब ते शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला पोहोचले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली.

शिवरायांबद्दल राज्यपालांनी, भाजप प्रवक्ते आणि भाजप मंत्र्यांनी विधानं केली आहे. त्यांना शिव्या द्यावात, आम्ही त्यांच्यावर फुलं उधळू. अपमान करणाऱ्यांना शिव्या द्या, आई-बहिणीवरून शिव्या देऊन दाखवा, महाराष्ट्र तुमचं कौतुक करेल, असंही संजय राऊत म्हणालेत.

शिवरायांबद्दल प्रेम दाखवण्याचे खोटं ढोंग आहे. शिवप्रेमाची महाराष्ट्रात लाट आली आहे. कुठलं शिवप्रेम आहे. भाजपला आम्ही नागाची उपमा दिली. मोदींना रावण म्हटलं तर टीका करतात, राज्यात शिवरायांचा अपमान होतो तर तिथे तुम्ही थंड पडता, तिथे नाग फणा काढत नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जर घोषणा केली असेल की, सीमाभागात भवन उभारण्याची घोषणा केली आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो, मुंबईमध्ये कानडी बांधवांची भवन मुंबईत उभारू दिली आहे. हॉल आहे, अनेक भवनं आहे. या लोकांशी काही वाद नाही. पण कानडी लोकांशी ही लोक वाद निर्माण करत आहे. मुद्दामहून वाद घातले जात आहे.

सोलापूर, कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक सरकार जर भवन उभारत असेल तर आम्हाला सुद्धा बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा दिली पाहिजे, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-