Top News

पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देणं दुर्दैवी- संजय राऊत

मुंबई | पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणून देणं हे दुर्देवी आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणातील शेतकरी आक्रमक झाले असून दिल्लीच्या सीमेवर त्यांना रोखण्यात आलं असून गेल्या चार दिवसांपासून आंदोलनं सुरु आहे. यावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्याला ज्या प्रकारे दिल्लीत येण्यापासून रोखण्यात आलं आहे. यावरुन असं वाटतं हे कोणी बाहेरुन आलेले शेतकरी आहेत देशातील नाहीत. त्यांना देण्यात आलेली वागणूक ही दहशतवाद्यांसारखी आहे. विशेषतः जे शीख आहेत आणि पंजाबमधून आले आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पंजाब आणि हरयाणातून आलेत म्हणून त्यांना विभाजनवादी, खलिस्तानवादी म्हणणं हा या देशातील शेतकऱ्यांचा अपमान आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

शेतकरी पाकिस्तानी नाहीत, केंद्रानं त्यांचं ऐकावं- अण्णा हजारे

“खासदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाहेरून आलेलं म्हणणं ही शोकांतिका”

दुसऱ्या वनडे सामन्यातही ऑस्ट्रेलियाकडून भारताचा धुव्वा; टीम इंडियाने मालिकाही गमावली

“हे सरकार आहे की तमाशा? कोण काय करतं ते दुसऱ्याला माहीत नसतं”

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील हीच काय ती भारताची एकमेव अचिव्हमेंट!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या