महाराष्ट्र मुंबई

“चंद्रकांतदादांचं पत्रलेखन म्हणजे उकळत्या किटलीतील रटरटता चहा”

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावरुन सामनाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे यांना नुकतच एक पत्र लिहिलं आहे. या पत्रावरुनच संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केलीये.

मुंबईतील महाकाली गुंफा विकू देणार नाही, एक इंचही जागा बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही, अशा विरोधी वक्तव्याच्या उकळ्या काही किटल्यांना फुटल्या आहेत. भाजपच्या ध्यानीमनी, स्वप्नी बिल्डरच आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही निर्णयात बिल्डरच दिसत असावेत, अशी बोचरी टीका राऊतांनी केलीये.

चंद्रकांतदादांचं पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखं आहे. दादांनी पत्र लिहिणं म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण उडणार. पुन्हा भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी सुरु केली आहे, असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

प. बंगालातील भाजप नेत्यांची अलीकडची भाषणे दादांच्या हवाली करुया. तेथे भाषाशुद्धीसंदर्भात मोठे काम चंद्रकांत पाटलांना करावं लागणार आहे. चीनने लडाखची जमीन गिळली तरी चालेल, पण मुंबईतल्या इंच इंच जमिनीसाठी किटल्यांनी उकळायलाच पाहिजे दादा, उचला लेखणी, करा त्या ढोंगावर हल्ला. महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केलीये.

थोडक्यात बातम्या-

क्रूरतेचा कळस! सांगवीत एका पोत्यामध्ये घालून भटक्या कुत्र्याला पेटवून दिलं…

“संधीची वाटच पाहतोय, फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नव्याने सरकार स्थापन करू”

“केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये गडकरींनी मध्यस्थी करावी”

“उद्धव ठाकरे पुढे किती दिवस ते मुख्यमंत्री राहतील हे सांगता येत नाही”

“मी कोरोनाची लस घेणार नाही, कोरोनाचे किती अवतार येऊदे मला काही होणार नाही

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या