Top News महाराष्ट्र मुंबई

विरोधकांचा दृष्टिकोण महाराष्ट्र हिताचा नाही, राज्यपालांनी त्यांना ‘खडेबोल’ सुनवायला हवेत- संजय राऊत

मुंबई | सरकारविरोधात ठणाणा बोंबा मारणे हे विरोधी पक्षाचे उद्योग आहेत. अशा बोंबा ठोकल्याने सरकारचा बालही बाका होणार नाही. विरोधी पक्षाचे सध्या 105 चे बळ आहे, ते कायम राहावे, अशा आमच्या त्यांना सदिच्छा आहेत, पण सरकारचे 170 आहेत, त्याचे दोनशे झालेच तर विरोधकांनी सरकारला दोष देऊ नये. विरोधकांचा दृष्टिकोण महाराष्ट्र हिताचा आणि विधायक नाही. विरोधासाठी विरोध हेच धोरण आहे व त्यासाठी राज्यपालांनी विरोधकांना ‘खडेबोल’ सुनवायला हवेत, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल या बाबतीत सडेतोड आहेत. त्यांना राज्यातले प्रशासकीय नेमणुकांचे अधिकार हवे आहेत. ते शेवटी देशाची घटना दुरुस्त करूनच मिळवावे लागतील, पण सध्या जे अधिकार त्यांच्या हाती आहेत, त्यांचा वापर करून त्यांनी राज्य अस्थिर करू पाहणार्‍या विरोधकांना राजभवनावर बोलवायला हवे आणि त्यांचे कान उपटायला हवेत, असं ते म्हणाले आहेत.

राजभवनाच्या दारात उभे राहून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे आता नेहमीचेच झाले आहे. ही मागणी त्यांनी गुजरातेत जाऊन करण्याची हिम्मत दाखवावी, असा सल्ला देखील त्यांनी विरोधी पक्षाला दिला आहे.

दोनेक वर्षांपूर्वी मुंबईच्या राजभवनाखाली एक ब्रिटिशकालीन भुयार सापडले. त्यात काही जुन्या गंजलेल्या तोफा वगैरे सापडल्याचे तेव्हा सांगितले गेले. महाराष्ट्रातील सरकार पडणार असे आवाज त्या गंजलेल्या तोफांतून काढावेत असे मनसुबे कोणी रचू नयेत. जुन्या तोफा म्हणजे हवा-पाण्याची नळकांडीच ठरतात. राजभवनातील हवा-पाणी गढूळ होणार नाही याची आम्हाला खात्री आहे, असंही ते म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात एकाच दिवशी 399 बाधित; महापौरांच्या खुलाश्याने पुणेकरांनी सोडला सुटकेचा निश्वास

रेल्वेचा गोंधळ… मुंबईत रात्री उशिरा CSMT आणि टिळक टर्मिनसवर झोप उडवणारी गर्दी

महत्वाच्या बातम्या-

राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी 14 दिवसांवर आणण्यात ठाकरे सरकारला यश

फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतल्या आकडेवारीवर पृथ्वीराज चव्हाणांचं चॅलेंज, म्हणाले…

केंद्राकडून राज्याला कोरोनाविरुद्ध उपाययोजनेसाठी एकही पैसा मिळाला नाही- वडेट्टीवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या