“बिहारला पूरस्थितीसाठी 18 हजार कोटी, महाराष्ट्रातील पूर दिसत नाही का?”

Sanjay Raut | राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. बऱ्याच ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे राज्यात पुर परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 23 जुलैरोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात बिहार आणि आंध्र प्रदेश राज्याला भरघोस निधी देण्यात आला. यावरूनच संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी थेट केंद्र सरकारला टार्गेट केलं आहे.

“महाराष्ट्रात भयंकर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. धोक्याची पातळी ओलांडून पुढे गेली आहे. बजेटमध्ये पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी बिहारला 18 हजार कोटी देण्यात आले. या सरकारला, या बजेटची वाहवा करणाऱ्या राज्यातील नेत्यांना सवाल आहे, त्यांना राज्यातील पूर दिसत नाही का?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

“बिहारला 18 हजार कोटी, आम्हाला 18 कोटी तर द्या”

तसंच, “बिहारला 18 हजार कोटी दिले, आम्हाला 18 कोटी तरी द्या, अशी म्हणायची हिम्मत यांच्यात आहे का?”, असंही राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना तिखट सवाल केले आहेत.

यावेळी राऊत यांनी अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांबाबतही भाष्य केलं. अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. त्यावरच बोलताना राऊत म्हणाले की, “देशमुखच का, भाजपच्या अनेक लोकांनी मलाही हे सांगितल होतं. अशोक चव्हाण, प्रफुल पटेल का गेले हे बघितलं की लक्षात येईल. मी तुरुंगात असताना अनिल देशमुख यांनी मला तुरुंगात सांगितलं होतं की, हे सत्य आहे, पण त्याला पुरावा देता येत नाही.”

“राज्याला नॉन बायोलॉजिकल गृहमंत्री..”

यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील हल्लाबोल केला. “नरेंद्र मोदी जसे नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान आहेत, तसे राज्याला नॉन बायोलॉजिकल गृहमंत्री लाभले आहेत. असं घाणेरडं राजकारण या देशात अमित शाह आणि राज्यात फडणवीस यांचा उदय झाल्यापासून सुरू झालंय.”, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. विदर्भाला देखील पावसाने झोडपून काढले आहे. पुणे, रायगड , ठाणे आणि कोल्हापूर येथील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने काही ठिकाणी वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे.

News Title – Sanjay Raut Slam Modi Govt Over Flood Situation In Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यभरात पावसाचा हाहाकार! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, रस्ते वाहतूकही ठप्प

ऐश्वर्या-अभिषेक घेणार ग्रे घटस्फोट?, ‘त्या’ पोस्टमुळे चर्चेला उधाण

पावसाळ्यात ‘हे’ अन्नपदार्थ खाऊ नका; अन्यथा होतील पोटाचे गंभीर विकार

तळीरामांची चांदी! देशभरात दारू होणार स्वस्त?, अर्थसंकल्पात काय केली तरतूद?

बजेटनंतर ‘या’ 9 शेअरमध्ये करा गुंतवणूक; होईल फायदाच फायदा