महाराष्ट्र मुंबई

“सरकारकडे विकासासाठी पैसा नाही पण निवडणुका जिंकण्यासाठी, सरकारे पाडण्या-बनवण्यासाठी पैसे आहे”

मुंबई | शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या रोखठोकमधून केंद्र राज्य वाद, राम मंदिर, नवीन संसदभवनाचं काम यांसारख्या विषयांवर भाष्य करत मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

मावळत्या वर्षात देशाने जे आघात सहन केले त्यांत कोरोनाचा हल्ला मोठा. लाखो लोकांनी प्राण गमावले. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे ‘संसद’ म्हणजे लोकशाहीचा आत्मा. तो आत्माच नष्ट झाला. शेतकऱ्यांचे आंदोलन ज्या तीन कृषी विधेयकांविरुद्ध सुरु आहे ती तीनही विधेयके बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतली गेली. आता त्या विधेयकांविरोधात शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे, असं संजय राऊत म्हणाले.

अयोध्येच्या राममंदिरासारखे भावनिक विषय उभे केले जातात, पण शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार सरकार करीत नाही, असं म्हणत राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

हिंदुस्थानात लोकशाही राजवट असल्याचे आपण मानतो, परंतु चार-पाच उद्योगपती, दोन – चार राजकारणी व्यक्ती आपल्या महत्त्वाकांक्षा, वैर, राग लोभ, अहंकार यांच्यासाठी देशाला कसे वेठीस धरतात याचे चित्र मावळत्या वर्षात दिसलं, असं राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची प्रकाश आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट!

…तर त्यांना 10 फूट खोल खड्यात पुरलं जाईल- शिवराज सिंह चौहान

 काँग्रेसला मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी

“वर्षभर आम्ही तुमचं ऐकलं, एक दिवस आमचं ऐका”

“बिहारमध्ये नितीश कुमार यांचं सरकार लवकरच कोसळणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या