बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आणीबाणीच्या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी राहुल गांधींना फटकारलं, म्हणाले…

मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी आणीबाणी चुकीची होती, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून जोरदार समाचार घेतला आहे.

आणीबाणी म्हणजे लोकशाही रुळावरून घसरली असे तिचे वर्णन खुद्द इंदिरा गांधींनीच केले होते. त्यानंतर आता आणीबाणी चुकीची होती अशी खंत आता राहुल गांधीयांनी व्यक्त केली. तशी गरज होती काय? आणीबाणी हा विषय कालबाहय़ झाला आहे. पुनः पुन्हा दळण का दळायचं?, असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

इंदिरा गांधींनी आणीबाणीत निरपराध लोकांना जो त्रास झाला, कुटुंब नियोजनाच्या मोहिमेत लोकांना जो जुलूम सहन करावा लागला त्याबद्दल खेद प्रदर्शित केला. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप बसविण्यात चूक झाली असं जाहीरपणे कबूल केलं आणि पुन्हा आणीबाणी आणणार नाही असं वचनही दिलं होतं, पण तरीसुद्धा त्यांनी अंतर्गत आणीबाणी जाहीर करण्यात आपण चूक केली असा पश्चात्ताप मुळीच केला नाही, असं संजय राऊत म्हणाले.

इंदिरा गांधी यांच्या पाठीशी प्रचंड बहुमत असूनही देशात राजकीय अस्थिरता वाढू लागली. त्यातून आणीबाणीचा भस्मासुर उदयास आला, पण पुन्हा आणीबाणी आणणार नाही या इंदिराजींच्या आश्वासनावर जनतेने विश्वास ठेवला आणि फक्त तीन वर्षांत पुन्हा त्यांना सत्तेवर आणलं. म्हणजे जनतेने त्यांना माफच केलं. मग राहुल गांधी यांना आजीच्या निर्णयाबद्दल माफी मागायचं कारण काय? आणीबाणी हा विषय कालबाहय़ झाला आहे. तो कायमचाच जमिनीखाली गाडला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

…अन् अशाप्रकारे कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा…

पाकिस्तानात हिंदू कुटुंबावर जीवघेणा हल्ला, 5 जणांचा जागीच मृत्यू

“आमदारकीसाठी नव्हे तर शेतकऱ्याला योग्य दाम मिळावा म्हणून आंदोलन”

‘देवदूतच ठरला यमदूत’! पैसे नसल्याने डॉक्टरांनी चिमुरडीचं शिवलं नाही पोट अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More