Top News विधानसभा निवडणूक 2019

“सत्तास्थापनेसाठी मध्यस्थी करण्याऐवजी केंद्राकडून आपले अधिकार वाढवून घ्या”

मुंबई | भाजप आणि शिवसेनेचं सरकार स्थापन होण्यासाठी किंबहुना त्यांनी सरकार स्थापन करावं म्हणून केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. भाजपला 3 वर्ष मुख्यमंत्रिपद तर सेनेला 2 वर्ष असा फॉर्म्युला देखील आठवलेंनी जाहीर केला आहे. त्यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आठवलेंना खोचक सल्ला दिला आहे.

सत्तास्थापनेसाठी मध्यस्थी करण्याऐवजी केंद्राकडून आपले अधिकार वाढवून घ्या, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपला 3 वर्ष मुख्यमंत्रिपद तर सेनेला 2 वर्ष…  आठवलेंकडून हाच फॉर्म्युला ऐकायचा बाकी राहिलो होतो, असं म्हणत त्यांची राऊतांनी खिल्लीही उडवली आहे.

रामदास आठवले हे केंद्रिय राज्यमंत्री आहेत. त्यांनी सत्तास्थापनेसाठी मध्यस्थी करण्याऐवजी केंद्राकडून आपले अधिकार वाढवून घ्यावेत, असं राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, आठवले यांनी राऊत यांची भेट घेऊन सद्यस्थितीच्या राजकारणावर चर्चा केली होती. तसंच शिवसेना आणि भाजपने एकत्रित सरकार स्थापन करावं, अशी विनंती केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या