‘त्यांचा माज वाढलाय’; नारायण राणेंनी शरद पवारांना दिलेल्या इशाऱ्यावर संजय राऊत संतापले
नवी दिल्ली | शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावर शिवसेना, भाजप आणि इतर राजकीय पक्षांचे नेते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. तर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र शिवसेना, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
नारायण राणे यांनी काल गुरुवार रोजी दोन वेगवेगळे ट्विट करत शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. आघाडी सरकार हे सोयीसाठी आणि स्वार्थासाठी तयार झालेलं सरकार आहे. त्यामुळे कामाच्या आणि कार्याच्या बढाया मारू नयेत. काही जणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणं शोभत नाही, असं खोचक ट्विट राऊतांनी केलं आहे.
राणेंनी बंडखोर आमदारांच्या केसालाही धक्का लागला तर शरद पवार यांना घर गाठणं कठिण होईल, असा थेट ईशाराच दिला आहे. यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राणेंच्या धमकीचा खरपूस समाचार घेतला आहे. पवारांच्या वयाचा, त्यांच्या पदाचा मान ठेवता येत नसेल तर आपण मराठी म्हणून घ्यायला देखील नालायक आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, शरद पवारांना घरी जाऊ देणार नाही, अशी धमकी देणारे कुणी राज्यात असेल तर त्यांचा विचार मोदी-शहांना करावा लागेल. असे थेट प्रत्युत्तर देखील त्यांनी भाजप आणि भाजपच्या नेत्यांना दिलं आहे.
महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही .रस्त्यात अडवू.अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो.ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल..पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाहीं@PMOIndia pic.twitter.com/YU1Pc39vCb
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 24, 2022
थोडक्यात बातम्या –
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या वक्तव्याने शिंदे गटाला मोठा धक्का!
’50 वर्षाच्या राजकारणात पवार साहेबांनी हे कमावलं’; निलेश राणेंचा पवारांना टोला
“शिवसेनेनं यापूर्वीही अशी गद्दारी पचवली, पुन्हा एकदा गद्दारांना गाडून आपला भगवा फडकवू”
‘…असल्या धमक्यांना भीक घालत नाही’, एकनाथ शिंदेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
‘…तर घर गाठणं कठिण होईल’, नारायण राणेंचा शरद पवारांना थेट इशारा
Comments are closed.