बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सामना’तून सरकारवरच टीकेचे बाण; वाचा ‘रोखठोक’मधील 10 धक्कादायक मुद्दे

मुंबई | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडलं. तसेच अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र पवारांनी अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. आता या प्रकरणावरून संजय राऊत यांनी ‘सामना’च्या रोखठोकमधून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

वाचा ‘रोखठोक’मधील 10 धक्कादायक मुद्दे

1. गृहमंत्र्यांनी वाझेंना 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिलं असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग करतात. त्या आरोपांचा सामना करायला सुरुवातीला कुणीच पुढे आलं नाही. सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची योजना नाही हे पुन्हा दिसलं.

2. सचिन वाझे हे आता रहस्यमय प्रकरण झालंय. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असा हा वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खऱ्या चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करत होता तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी?

3. देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळालं. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते.

4. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो.

5. अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही.

6.’ सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल?

7. एका वसुलीबाज फौजदाराचा बचाव सुरुवातीला विधिमंडळात केला. त्यानंतर परमबीर सिंग यांच्या आरोपांना कुणी उत्तर द्यायला तयार नव्हते व मीडियाचा ताबा काही काळासाठी विरोधी पक्षनेत्यांनी घेतला हे चित्र भयंकर होते.

8. अनिल देशमुख, वाझे, परमबीर यांचे पत्र या सर्व घोळात सरकारचा पाय नक्कीच अडकला. तो पुनःपुन्हा अडकू नये.

9. वाझे हा साधा फौजदार, रश्मी शुक्ला या ज्येष्ठ आयपीएस. परमबीर हे त्यापेक्षा ज्येष्ठ. अधिकाऱ्यांवर विसंबून राहण्याचा परिणाम राज्य सरकार भोगत आहे.

10.सरकारने काय करावे हे सांगण्यासाठी हा प्रपंच नाही. सरकार निसरडय़ा टोकावरून घसरत आहे व नशिबाने वाचत आहे. या सर्व खेळात महाराष्ट्राला नक्की काय मिळालं? निदान महाराष्ट्राच्या चारित्र्यावर तरी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये.

थोडक्यात बातम्या- 

‘तिने माझं आयुष्य बरबाद केलं’; दिपाली चव्हाणांनी पतीला लिहिलेल्या पत्रात उल्लेख केलेली ‘ती’ महिला कोण?

राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन नेत्यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

वकील असलेल्या पत्नीनेच केली पतीची हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

फडणवीस साहेब फार मोठे नेते आहेत, मी त्यांच्यापुढे छोटा आहे- सचिन सावंत

गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावं, ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणं हे बरं नाही- संजय राऊत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More