Sanjay Raut | शिवसेनेमध्ये उभी फूट पडून आता दोन वर्षांपर्यतचा कालावधी गेला आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचं होतं. मात्र आता निवडणूक आयोगाच्या सुनावणीने हे पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात आलं. असं असलं तरीही लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची मशाल पेटलेली दिसली. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदेंवर पक्ष आणि चिन्हावरून डिवचलं आहे.
संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला
शिवसेनेचा वर्धापन दिन हा दोन्ही गटाने साजरा केला. तेव्हा दोन्ही गटाने एकमेकांवर टीकास्त्र सोडलं आहे. शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पुजण्याचा अधिकार नाही, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे. ते म्हणाले की, निवडणूक आयोग, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देवघरात तसबीर ठेवून त्याची पूजा करावी, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
त्यानंतर बोलत असताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, हिंमत असेल तर चोरलेला पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हा परत करा, निवडणूक लढवून दाखवा. जर शिवसेनेचे चिन्ह असते तर लोकसभेला उद्धव ठाकरे गटाला 22 जागा मिळाल्या असत्या, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.
चोरलेल्या पक्षावर आणि चिन्हावर निवडून येणं म्हणजे ठासून येणं असं म्हणत नाहीत. जनतेने लोकसभेत त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. आता विधानसभेतही महायुतीमध्ये वाताहत होत आहे. जनता त्यांना जागा दाखवून देणार आहे. यामुळे त्यांनी विधानसभेती भीतीमुळे आता तयारी सुरू केली असल्याचं राऊत म्हणाले आहेत.
“स्वतंत्र चिन्ह घ्यावं निवडणुकीला उभं राहावं”
त्यांनी स्वतंत्र चिन्ह घ्यावं आणि विधानसभेच्या निवडणुकीला उभं राहावं, असं आव्हान राऊतांनी केलं. यावेळी बोलत असताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नारायण राणेंचा देखील उल्लेख केला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने राज्यात सर्वाधिक 30 जागांवर विजय मिळवला आहे. तर महायुतीला राज्यात केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. राज्यात महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे.
News Title – Sanjay Raut Slam To Eknath Shinde Over Shivsena Party And Shivsena Symbol
महत्त्वाच्या बातम्या
लोकसभेतील अपयश सामूहिक, ‘अकेला देवेंद्र’ जबाबदार नाही’
महागाईचा झटका! पेट्रोल-डिझेलचे दर तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार
पुण्यासह या जिल्ह्यांत पाऊस हजेरी लावणार; यलो अलर्ट जारी
मोदी सरकारने घेतला शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय!
या राशीच्या व्यक्तींच्या खिशाला कात्री लागणार