महाराष्ट्र मुंबई

“भाजप कार्यकर्ता नटी म्हणते मुंबई म्हणजे PoK, योगींनी सांगावं ते नेमके कुठे आलेत”

मुंबई | भाजपची कार्यकर्ता असलेली ती नटी मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर असल्याचं म्हणाली होती. योगी आदित्यनाथ मुंबईत आलेत की पाकव्याप्त काश्मीरमध्ये आलेत हे त्यांनी स्पष्ट करावं, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगणा राणावत आणि  योगी आदित्यनाथ यांना लगावलाय.

योगी आदित्यनाथ यांनी सांगायला हवं की मी मुंबईत आलो आहे. मुंबईत सुरक्षित असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगायला हवं, असं संजय राऊत म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

मुंबईचे जे महत्व आहे, त्याला कुणीही नखं लावू शकत नाही. युपीसारख्या मागास राज्याचा विकास होणार असेल तर आम्ही स्वागत करतो, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

मुंबईत सर्वांना यावं लागतं, मुंबई देशाचे पोट भरते. उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढवण्यासाठी योगींना मुंबईतच यावं लागलं, हा मुंबईचा गौरव आहे, असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला जामीन मंजूर!

व्हाईटवॉश टळला! तिसऱ्या वनडे सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर 13 रन्सने मात

लष्करी जवान आणि माजी सैनिकांनाही प्राधान्याने कोरोनाची लस द्या- बाळा नांदगावकर

बॉलिवूड मुंबईतच राहणार, आम्ही काही घेऊन जायला आलो नाही- योगी आदित्यनाथ

मुंबईत बॉलिवूडचं वास्तव्य, सोयी-सुविधा असताना उत्तरप्रदेशात कोण जाईल?- अशोक चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या