महाराष्ट्र मुंबई

…याचा विसर जर कोणाला पडला असेल तर इतिहास त्यांना माफ करणार नाही- संजय राऊत

मुंबई | ज्याप्रकारे राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेशचे पोलीस वागत होते, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडलं हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारं नाही, असं शिवसेना नेेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्कीचा संजय राऊत यांनी निषेध केला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

राहुल गांधी खासदार आहेत सोबतच माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे नातू तसंच राजीव गांधींचे पुत्र आहेत. या दोघांनीही देशासाठी बलिदान दिलं आहे. रक्त सांडलं आहे. याचा विसर जर कोणाला पडला असेल तर इतिहास त्यांना माफ करणार नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

‘मुलगी कोरोनाने मेली असती तर…’; हाथरसच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांचं धक्कादायक वक्तव्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण!

पुण्यात शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा खून!

पंजाब नॅशनल बँकेत ‘इतक्या’ कोटींचा घोटाळा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या