बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी राजकारणातलं प्यादं बनू नये”

मुंबई | विधान परिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित 12 सदस्यांच्या नियुक्तीबाबत मंत्रिमंडळाने पाठवलेल्या शिफारशींच्या प्रस्तावावर अद्यापही निर्णय झालेला नाही. यानंतर निर्णय घेणं हे राज्यपालांचं घटनात्मक कर्तव्य आहे, ते त्यांनी विनाविलंब पार पाडावं, असा सल्ला उच्च न्यायालयाने दिला आहे. यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं आहे.

राज्यपालांनी राजकारणातलं प्यादं बनू नये, राज्यांच्या अधिकारावर, कॅबिनेटच्या अधिकारावर जर ते अतिक्रमण करत असतील, तर देशाच्या अधिकारांवर संघराज्यवर हल्ला आहे, अशी टीका संजय राऊतांनी भगतसिंग कोश्यारींवर केली आहे.

राज्यपाल कोश्यारी प्रेमळ आहेत. मी त्यांच्यासोबत काम केलं आहे. पण त्यांनी 12 आमदारांसंदर्भात घेतलेली भूमिका राजकीय आहे. ते मनापासून हे करत नसावेत. पण त्यांची नेमणूक ज्या पक्षाकडून झाली आहे. त्या पक्षाच्या भूमिकेला, दबावाला अनुसरुन ते काम करत आहेत. पण त्यांनी दबाव झुगारुन स्वाभिमानी बनून घटनेचे रखवालदार ही भूमिका निभावली पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्री अमित शहांनी जसं 370 कलम हटवलं आणि खूप मोठा इतिहास केला, तसं महाराष्ट्रामध्ये देखील जे 12 आमदारांवर जी राजकीय बंदी घातलेली आहे ती त्यांनी उठवावी, असा सल्ला संजय राऊतांनी राज्यपालांना दिला.

थोडक्यात बातम्या-

रानडे इंस्टिट्यूटच्या स्थलांतराला अखेर स्थगिती; विद्यार्थ्यांच्या मागणीला मोठं यश

कोरोना लढ्यात आणखी एक लस उपलब्ध; आता नाकातून घेता येणार लस

“माझा मुलगा मला म्हणाला की यावर बोलू नको पण मी बोलणार, केंद्र सरकारने…”

‘तुम्ही विचार स्वातंत्र्यावर निर्बंध कसं घालू शकता?’; उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं

…नाहीतर पीएफ खात्यातून ऑनलाईन पैसे काढता येणार नाहीत, जाणून घ्या अधिक माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More