बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर अशा लोकांवर गंगामाईचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही”

मुंबई | भाजपची तडफड आणि तगमग आपण समजू शकतो. त्यांना फक्त लोकांची डोकी भडकावून राजकारण करायचंय. सुप्रीम कोर्टापासून मोदींपर्यंत सगळ्यांचं म्हणणं आहे की, निर्बंध पाळा. तिसऱ्या लाटेपासून सावध राहा पण महाराष्ट्र भाजपचं राजकारण दुसर्‍या टोकाचं. ते सुप्रीम कोर्ट व पंतप्रधानांनाही जुमानत नाही असं दिसतंय. गंगेच्या प्रवाहात श्रद्धाळूंचे मृतदेह वाहातच रहावेत हीच त्यांची भावना असेल तर गंगामाईचा कोप अशा लोकांवर झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेनं भाजप नेत्यांवर केलीये.

महाराष्ट्रातील भाजप पुढारी पंढपूरच्या वारीसाठी परवानगी द्या, असं टुमणं लावून वारकऱ्यांना भडकावत आहे. सुप्रीम कोर्ट आणि पंतप्रधानांनी सांगूनही भाजप पुढाऱ्यांच्या डोक्यातील बटाट्यांना अकलेचे कोंब फुटू नयेत याचंच आश्चर्य वाटतं, अशी बोचरी टीका शिवसेनेनं अग्रलेखातून केलीये.

याच गंगेने हजारो कोरोनाग्रस्तांची प्रेते पोटात घेऊन अश्रू ढाळले आहेत… दुसऱ्या लाटेच्या तडाख्याने समाज हादरुन गेला आहे… तिसऱ्या लाटेने पूर्ण उद्ध्वस्त होऊन कोलमडू नये. पंढरपूरची वारी असेल नाहीतर हरिद्वारची कावड यात्रा, भक्तांचे प्राण महत्वाचे, असं अग्रलेखात म्हटलंय.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी त्यांनी कावड यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला… हा त्यांचा अनुभव आणि शहाणपण आहे… मग धामी हिंदुविरोधी आहेत असा ठपका ठेवून धामींना हाकला अशी मागणी कोण करणार आहेत काय?, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलाय.

थोडक्यात बातम्या- 

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मोठी बातमी!

आयटी क्षेत्रातील ‘ही’ दिग्गज कंपनी 35 हजार जणांना नोकर्‍या देणार!

राहुल वैद्य आणि दिशा परमारची लगीनघाई; हळद, मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

आषाढी वारी निमित्त मृण्मयी देशपांडेचा मराठमोळा साज, पाहा फोटो!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More