मुंबई | संसदेतील गोंधळाचं खापर विरोधकांवर फोडून तुमच्या त्या लोकशाहीचं श्राद्धच घाला, अशा शब्दात शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
‘पेगॅसस’ जासुसी प्रकरण हे राष्ट्रीय सुरक्षेचं गंभीर प्रकरण आहे. इस्त्रायलकडून ‘पेगॅसस’ खरेदी करून भारतातील राजकारणी, पत्रकार, लष्करी अधिकारी यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. हे सरकारला वाटतं तितकं सोपं प्रकरण आहे काय? या विषयावर संसदेत चर्चा व्हावी आणि पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी त्यावर खुलासा करावा, ही विरोधकांची मागणी लोकशाहीला धरूनच आहे, पण सरकार ऐकायला तयार नाही, असं शिवसेनेनं म्हटलंय.
म्हणजे लोकशाही, संसदीय संकेत, विरोधकांच्या भावना पायदळी तुडवून पुन्हा आम्हीच लोकशाहीचे रक्षक, असे सरकार पक्ष बोलत आहे. जासुसी प्रकरणावर संसदेत चारेक तास चर्चा झाली व सरकारने उत्तर दिले तर काय बिघडणार आहे? विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेण्याची संधी सरकारला मिळेल, पण सरकार तेही करायला तयार नाही. मग लोकशाहीचे मारेकरी कोण?, असा सवाल शिवसेनेनं केलाय.
पंतप्रधान मोदी यांनी थोडा पुढाकार घेतला असता तर संसदेचं काम सुरळीत चाललं असतं आणि लोकशाहीचा अपमान टाळता आला असता. संसदेची, लोकशाहीची प्रतिष्ठा राखण्याचं कर्तव्य सत्ताधारी पक्षालाच पार पाडावं लागतं. तसं आज होताना दिसत नाही. विरोधकांना कस्पटासमान लेखण्याची नशा सत्ताधाऱ्यांना चढली आहे. त्यातून देशाला फार मोठी किंमत चुकवावी लागेल, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी
अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीचं ‘नाचता येईना अंगण वाकडं’- प्रविण दरेकर
मोठी बातमी! पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या तारखेत पुन्हा बदल
बुमराह-शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची शरणागती
कौतुकास्पद! दूध विकणाऱ्या महिलेची मुलगी बनली आयएसएस, देशात मिळवली 12वी रॅंक
Comments are closed.