बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून भारतीय व्यक्तींचं स्वीस बँकेमधील गौडबंगाल कधी उघडकीस येत नाही”

मुंबई | संसदेत सत्ताधारी-विरोधी बाकांची अदलाबदल झाली, पण काळ्या पैशाबाबत नेमका बदल काय घडला?, असा सवाल करत शिवसेनेनं आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

गेल्या 10 वर्षांत भारतातील किती व्यक्तींनी किती काळा पैसा स्वीस बँकेत जमा केला, याची कोणतीही अधिकृत माहिती सरकारकडे उपलब्ध नसल्याचं केंद्र सरकारने संसदेत सांगितलं. काँग्रेसच्या एका खासदाराने उपस्थित केलेल्या प्रश्नावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी हे लेखी उत्तर आहे. यावर प्रश्न उपस्थित करत शिवसेनेनं अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

काळे धन किती आणि गोरे किती, याविषयी कुठलीही माहिती स्वीस बँका कधीच देत नाहीत. ज्या धनावर त्या बँका मालामाल होत आहेत, त्यांचा देश संपन्न होत आहे, ती माहिती जगजाहीर करून आपला धंदा म्हणा किंवा व्यवसाय स्वीस बँका का ठप्प करतील? मुळात या प्रश्नाचे खरं उत्तर कोणालाच नको असतं. हवी असते ती फक्त अवाढव्य आकड्यांच्या आरोपांची राळ आणि खळबळ. त्यामुळे स्वीस बँकांमध्ये भारतीय व्यक्तींनी किती काळा पैसा दडवून ठेवला आहे, याचे गौडबंगाल कधीच उघडकीस येत नाही, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

भ्रष्ट मार्गाने कमावलेला आणि स्वीस बँकांमध्ये लपवून ठेवलेला हा काळा पैसा भारतात वापस आणू आणि तो पैसा परत आणल्यानंतर देशातील नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा करू, अशी आश्वासने दिली जातात. लोकही या जुमलेबाजीवर विश्वास ठेवतात, पण तेदेखील एक गौडबंगालच राहते आणि सामान्य माणूसही ते आश्वासन पूर्ण ‘होणार नाही’ अशी स्वतःची समजूत करून घेतो, असा टोला शिवसेनेनं अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ महिन्यापासून लहान मुलांना मिळणार कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना तातडीचं पत्र; केलं ‘ही’ मोठी मागणी

राज्य सरकारचा पूरग्रस्तांना दिलासा; करणार इतक्या हजार कोटींची मदत

‘या’ लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही…; अभ्यासातून चिंताजनक माहिती समोर

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More