बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पेगॅससची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं”

मुंबई | पेगॅससची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं, अशी टीका शिवसेनेनं आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर केली आहे.

आमचं हे छोटं पाऊल इतरांना जाग आणेल, असं निवेदन ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. ममता यांचं म्हणणं खरंच आहे. केंद्र सरकारने तर हातच झटकले. म्हणे पेगॅसस वगैरे झूठ आहे. अशी काही हेरगिरी झालीच नसल्याचं केंद्राने दणकून खोटं सांगितलं आहे. या प्रकरणाची चौकशी केंद्राने केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं, पण पेगॅससच्या हेर मंडळात इथलेच कोणी सामील असल्याने चौकशीत भलतेच बिंग उघड्यावर येईल काय? असं सरकारला वाटलं असेल, असं म्हणत शिवसेनेनं अग्रलेखातून सरकारवर निशाणा साधला आहे.

फ्रान्समधील काही पत्रकारांची हेरगिरी पेगॅससने केल्याचं समोर आणताच फ्रान्स सरकारने त्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मोरक्कोच्या गुप्तचर संघटनांनी इस्रायली पेगॅससचा वापर करून फ्रान्समधील प्रमुख पत्रकारांवर पाळत ठेवली होती. फ्रान्स सरकारने त्याबाबत मोरक्को सरकारला कडक शब्दांत जाब विचारलाच आहे आणि या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीसुद्धा सुरू केली. आपण फ्रान्सकडून फक्त महागडी राफेल विकत घेतली. पण हा निष्पक्ष आणि स्वाभिमानी बाणा घेतला नाही, असा टोला अग्रलेखातून सरकारला लगावला आहे.

दरम्यान, हेरगिरीमागचे सूत्रधार कोण आहेत? हे समजून घेण्याचा अधिकार देशाला आहे. फ्रान्ससारखा देश पेगॅससची चौकशी करू शकतो, तर मग हिंदुस्थानचे सरकार का नाही? कर नाही त्याला डर कशाला? हे फ्रान्सने दाखवून दिलं, असंही अग्रलेखात म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

जयंत पाटलांच्या तब्येतीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती!

देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकरांनी पूरग्रस्तांसोबत केलं जेवण!

मोठी बातमी! राज्यातील निर्बंधांबाबत महत्वाची अपडेट, वाचा सविस्तर

“बरेच दिवस अच्छे दिनची वाट पाहिली, आता सच्चे दिन दाखवण्याची गरज”

…म्हणून अमेरिका भारताला करणार तब्बल ‘एवढ्या’ कोटी डाॅलरची मदत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More