बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, संजय राऊत राणेंना अग्रलेखात काय काय म्हणाले?

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यामुळे राणेंना अटक देखील करण्यात आली. आता या प्रकरणावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून नारायण राणेंवर सडकून टीका केली आहे. भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, उपटसुंभ, सरडा अशा उपमा देत राऊतांनी राणेंवर टीकास्त्र सोडलंय. तसेच भाजपला देखील खडेबोल सुनावले आहेत.

मुख्यमंत्रीपद ही व्यक्ती नसून घटना व संसदीय लोकशाहीचे कवच असलेली संस्था आहे. तुम्ही व्यक्तीवर टीका करा. तुमच्या भुंकण्याकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही, पण राज्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यावर शारीरिक हल्ला करण्याची भाषा करणारा माणूस महाराष्ट्राच्या मातीत निपजावा याची वेदना सगळ्यांना आहे. अशा उपटसुंभांना भारतीय जनता पक्षाने ‘मांडीवर’ घ्यावं हे त्यांच्या संस्काराचे अधःपतन आहे, अशी टीका राऊतांनी केली आहे.

राणे यांना काही लोक ‘डराव डराव’ करणाऱ्या बेडकाचीही उपमा देतात. राणे हे बेडुक असतील किंवा भोकवाला फुगा, पण राणे कोण? हे त्यांनी स्वतःच जाहीर केलं. मी नॉर्मल माणूस नाही, असं त्यांनी जाहीर केलं. मग ते ऍबनॉर्मल आहेत काय ते तपासावं लागेल. मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये राणे हे अती सूक्ष्म खात्याचं लघु उद्योगमंत्री आहेत, अशी बोचरी टीका राऊतांनी अग्रलेखातून केलीये.

दरम्यान, शिवसेना सोडून 20 वर्षांचा काळ उलटला तरी या महाशयांचे शिवसेनाद्वेषाचे तुणतुणे सुरुच आहे. या काळात त्यांनी सरडा लाजेल असे रंग बदलले. त्यांचे भांडवल एकच, ते म्हणजे शिवसेना व ठाकऱ्यांवर यथेच्छ चिखलफेक करणे. त्या चिखलफेकीचे इनाम म्हणून महाशयांना सूक्ष्म उद्योगाचे मंत्रीपद भाजपने केंद्रात दिले आहे. ते खाते इतके सूक्ष्म आहे की, हाती लाल दिव्याच्या गाडीशिवाय काहीच लागलेलं नाही. त्यामुळे शिवसेनेवर भुंकण्याचे जुनेच उद्योग त्यांनी सुरु ठेवले आहेत, अशा शब्दांत राऊतांनी राणेंवर टीकास्त्र सोडलंय.

थोडक्यात बातम्या- 

जामिनावर सुटताच नारायण राणेंचं पहिलं ट्विट, म्हणाले,

बैलगाडा शर्यत सुरू करण्यासंदर्भात जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

आनंदाची बातमी! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

“भाजपला सत्तेची भूक आणि लालच असल्याने राणेंना केंद्रात मंत्रिपद”

वातावरण तापलं! शिवसेना खासदाराच्या घरावर उमटले राणेंच्या अटकेचे पडसाद!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More