बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राणेंच्या पोरांनी बापाचं नुकसान केलंय, त्यांच्या 2 मुलांची भाषा, भाजपच्या नव्या संस्कृतीचा उदय”

मुंबई | नारायण राणे यांच्या राजकीय कारकीर्दीचं सगळ्यात जास्त नुकसान त्यांच्या मुलांनी केलं आहे. टीका करणं आणि स्वीकारणं ही लोकशाहीची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, पण ठाकऱ्यांपासून पवारांपर्यंत, राहुल गांधींपासून मोदींपर्यंत सगळ्याचे ‘आईबाप’ काढणाऱ्या राणेंच्या मुलांनी त्यांच्या पिताश्रींचं नुकसान केलंय, असं म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र नितेश आणि नीलेश राणे यांच्यावर टीका केली आहे.

राणे यांची मुले इतरांचे बाप ऊठसूट जाहीरपणे काढतात. तुम्ही बिनबापाचे आहात काय?, असा प्रश्न त्यांना एक दिवस भारतीय जनता पक्षाचे लोक विचारतील तेव्हा ते काय उत्तर देतील? महाराष्ट्राच्या राजकारणातील हे गढूळ प्रवाह थांबलं नाही तर राज्याची बदनामी होईल, असं संजय राऊतांनी म्हटलंय.

राणे व त्यांच्या मुलांनी काँग्रेस पक्षात असताना नरेंद्र मोदी, वीर सावरकर यांच्याविषयी याच असभ्य भाषेचा वापर केला होता. घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींचा एकेरी पद्धतीने अपमानास्पद उल्लेख करण्याचा अधिकार राणे व त्यांच्या मुलांना कोणी दिला?, असा सवालही राऊतांनी केलाय.

एक दिवस हीच वेळ राणेपुत्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांवर आणतील. हे राजकारण खरं नाही, असं श्री. फडणवीसांनी एकदा राणे यांना समोर बसवून समजावून सांगायला हवं. कारण फडणवीस यांचा उल्लेख श्री. राणे यांनी ‘मार्गदर्शक’ म्हणून केला आहे, असा टोला राऊतांनी देवेंद्र फडणवीस आणि राणेंना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“भारतात पंतप्रधानांनी शपथ घेतली, की संसद आत्महत्या करते”

“पवारसाहेब एका मुलीवर थांबले, मी दोनवर थांबलो, तुम्ही पलटन वाढवू नका”

सरकारला ‘ही’ माहिती द्या आणि मिळवा लाखो रूपये; जाणून घ्या कसे?

100 कोटी वसूली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI कडून क्लिनचीट?

मुंबई महापालिका आयुक्तांची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More