बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशात केवळ 23 कोटी लसी दिल्या गेल्या, पुराव्यानिशी सिद्ध करू”

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. देशात 100 कोटी लसीकरण झाले हा दावा खोटा आहे. केवळ 23 कोटी लसी दिल्या गेल्या आहेत, ही बाब आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करू, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

लडाखमध्ये चिनी सैन्य सीमा पार करून भारताच्या हद्दीत घुसले आहे. तर काश्मीरमध्ये हत्याकांड होत आहेत आणि आपल्याकडे लसीचे उत्सव साजरे केले जातात, अशी टीकाही राऊत यांनी केली. देशातील वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर यावर कुणी काही बोलत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

देशात कोरोनाविरोधातील लसीकरणाच्या मोहिमेत नुकताच लसीचे 100 कोटी डोस देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करण्यात आला. कोरोनाविरोधातील लढाईमध्ये देशाने मिळवलेले हे मोठे यश असल्याचे मानलं जात आहे. मात्र यावरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

दरम्यान, याआधी 100 कोटी डोस खरोखर पूर्ण झाले आहेत का?, असा सवाल संजय राऊत यांनी केंद्र सरकारला केला होता. जगामध्ये आपला देश लसीकरणात 19 व्या स्थानावर आहे. या संदर्भात वेगवेगळे आकडे बाहेर येत असतात, असं राऊत म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या- 

पाकिस्तान टीम इंडियाला नक्की हरवणार- इम्रान खान

‘…तर आम्हाला थेट मॅसेज करा’; पाकिस्तान टीमसाठी झोमॅटोचं ट्विट

‘या’ तारखेपासून पुन्हा पाऊस बरसणार; शेतकऱ्यांना सतर्कतेचं आवाहन

‘…तर पुन्हा कोरोनाची भयावह लाट येऊ शकते’; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फोन, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More