बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सेना भवनापर्यंत स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जावं लागेल”

मुंबई | शिवसेनेला वाटतं की आम्ही माहीममध्ये आल्यावर सेना भवन फुटेल. त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही ते सुद्धा करू, असं वादग्रस्त वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं. यानंतर शिवसेेना नेत्यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आता शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून प्रसाद लाड यांच्यावर सडकून टीका केलीये.

शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जाण्याची वेळ येईल, यायचंय तर या मग, असा इशारा शिवसेनेनं प्रसाद लाड आणि नितेश राणे यांना दिला आहे.

खरंतर या मंडळींची दखल घ्यावी आणि त्या टिनपाटांवर इथे काही लिहिण्या-बोलण्याची आमची अजिबात इच्छा नाही. पुन्हा हे जे कोणी फोडा- झोडा याची भाषा करीत आहेत त्यांची लायकी फक्त चिंधीचोर दलालांची आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं प्रसाद लाड आणि नितेश राणेंना अग्रलेखातून फटकारलं आहे.

शिवसेनेच्या विध्वंसाची जी भाषा आजचे पावटी पावन भाजपवाले बडबडत आहेत ते त्यांचं पोटाचं जुनं दुखणं आहे. असे बाटगे हेच महाराष्ट्र आणि मराठी माणसांसाठी काळ ठरत आले, पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. त्यांचे नामोनिशाणही उरले नाही, अशी बोचरी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘कोरोनाची तिसरी लाट अटळ पण…’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

अजब लग्नाची गजब गोष्ट; अन् चक्क वयाच्या 60 व्या वर्षी आजोबा चढले बोहल्यावर

बलात्कारानंतर आरोपीशी लग्न करण्यासाठी पीडितेची सर्वोच्च न्यायालयात धाव अन्..; चक्रावुन टाकणारा प्रकार

मुंबईकरांनी करून दाखवलं; मुंबईतील कोरोना रूग्णसंख्येत विक्रमी घट

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीत सुधारणा; पाहा आजचे सकारात्मक आकडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More