बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आता मी आलोय, तुमच्या प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय राहणार नाही”

ठाणे | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या विशेष पथकाने काही महत्त्वाचे निष्कर्ष काढले आहेत. आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नसल्याचं एनसीबी विशेष पथकाच्या तपासात समोर आलं आहे. या प्रकरणाचा उल्लेख करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.

आर्यन खानचा ड्रग्ज प्रकरणात काहीच संबंध नसल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणाचं सत्य बाहेर आलं आहे. या प्रकरणात बनाव केला गेला होता. तपास यंत्रणांचा दुरूपयोग नव्हतं तर काय होतं? आर्यन खान प्रकरणात जसा बनाव केला गेला आहे तसाच आमच्या प्रकरणातही केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

आतापर्यंत मी यात पडलो नव्हतो पण आता मी समोर आलोय. आता तुमच्या प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय मी राहणार नाही. तुम्हाला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. माझे शब्द लिहून ठेवा, असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

दरम्यान, बाप-बेटे तुरूगांत जाणारच आहेत, असा पुनरुच्चार देखील संजय राऊत यांनी केला. तर तुम्ही घोटाळा नाही केला तर मग अटकपूर्व जामिनासाठी का धडपडत आहात?, असा सवाल देखील राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना उद्देशून विचारला आहे.

थोडक्यात बातम्या-

“संजय तू पुरावे देच, मी पण तुझ्या नेत्यांच्या कारनाम्याची लिस्ट ईडीकडे पाठवतो”

सर्वात मोठी बातमी; आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण

“मी पुन्हा सांगतो, बाप-बेटे जेलमध्ये जाणार म्हणजे जाणार”

‘या’ भागात मुसळधार पाऊस कोसळणार, पुढचे पाच दिवस महत्त्वाचे

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी शरद पवारांचा मोदी सरकारला सल्ला, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More