महाराष्ट्र मुंबई

‘पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर…’; संजय राऊत आक्रमक

मुंबई | पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहा. समझनेवाले को इशारा काफी है, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

माझ्या कुटुंबाला ईडीची नोटीस आल्याची बातमी प्रसारित झाल्यानंतर अचानक गोदी मीडियातले लहान कमळं फुलायला लागली आहेत. या राजकीय पोपटांचा वापर राजकीय कामांसाठी कशा पध्दतीनं केला जातोय हे जनतेला माहीत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

माझ्या कुटुंबाचं नाव पीएमसी आणि एचडीआयएल घोटाळ्यामध्ये विनाकरण गोवण्यात आलंय, असं संजय राऊत म्हणालेत.

दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. मंगळवारी ईडीच्या कार्यालयात हजर न राहू शकलेल्या वर्षा राऊत यांना आता 5 जानेवारीला ईडी समोर हजर व्हावं लागणार आहे. या प्रकरणी आता राजकारण तापू लागल्याचं दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

राहुल गांधी गर्भश्रीमंत, मी शेतकऱ्याच्या घरात जन्मलोय- राजनाथ सिंह

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या हत्येची सुपारी; पुण्यात खळबळ

‘काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत’; या काँग्रेस नेत्याचा राऊतांना इशारा

दिल्लीत बसून शेतीक्षेत्र चालवता येत नाही- शरद पवार

संजय राऊत बिथरले, हादरले आणि घाबरले आहेत- आशिष शेलार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या