बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अहमदनगरमधील ‘त्या’ घटनेवरून संजय राऊत सरकारवर भडकले, म्हणतात….

मुंबई | अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागली आणि 11 रूग्णांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर सगळ्याच स्तरावरून हळहळ व्यक्त केली जात असताना या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. अहमदनगर येथील या दुर्घटनेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहे.

अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील दुर्घटनेनंतर संजय राऊतांनी आक्रमक पवित्रा घेत केंद्रातील मोदी सरकारसह राज्यातील ठाकरे सरकारवरही ताशेरे ओढले आहेत. आता घटना घडून गेल्यावर अश्रु ढाळू नका पण असे प्रकार परत घडू नयेत यासाठी कोणते पावलं उचलणार हे सांगा, असा सवाल राऊतांनी दोन्ही सरकारसमोर उपस्थित केला आहे.

नगरच्या इस्पितळातील दुर्घटनेसाठी निमित्त शॉर्ट सर्किट ठरलं असलं तरी आरोग्य व्यवस्थेची ही होरपळ आता तरी थांबायला हवी, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. तर सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही अर्थात केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचीही जबाबदारी असल्याचा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, सध्या मरण स्वस्त झालं आहे मान्य आहे पण ते इतकं क्रुर व अमानुष असावं, अशी खंत संजय राऊतांनी व्यक्त केली. आता या घटना पुन्हा पुन्हा घडू नयेत यासाठी कोणते ठोस पाऊलं उचलणार? असा सवाल राऊतांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला विचारला आहे.

थोडक्यात बातम्या-

“राष्ट्रवादीने आता पवारसाहेबांवर जास्त हक्क सांगू नये”

मी भाजप नेत्यांपुढे हात जोडतो पण तुम्ही….- नवाब मलिक

मोठी बातमी! अनिल देशमुखांना न्यायालयाचा झटका

“नवाब मलिक बोलना बंद नही करेगा तो तेरा बेटा लंबा जायेगा”

“नवाब मलिकांना हे आजच कसं सुचलं? एक महिना काय झोपले होते का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More