‘…नाहीतर महाराष्ट्राला या महान कलावंताची ओळख झालीच नसती’, वेशांतर भेटीवरून शिवसेनेची टोलेबाजी
मुंबई | शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद काही कालचे नाहीत. 2019 साली युती तुटली तेव्हापासून भाजप आणि शिवसेना जणू एकमेकांवर तुटूनच पडले आहेत. त्यात एकनाथ शिंदेंनी बंड करुन शिवसेना फोडल्यापासून तर हे वाद विकोपाला गेले आहेत.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक खुलासा केला. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस रात्री वेशांतर करुन बाहेर एकनाथ शिंदेंना भेटायला जायचे असं म्हटलं होतं. आता फडणवीसांच्या रात्री-बेरात्री वेशांतर भेटींची सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. त्यात आता शिवसेनेने त्यांच्यावर टीकेचे धनुष्यबाण सोडले आहेत.
महाराष्ट्रात सरळ सरळ महाभारत घडत आहे. एकाच घरातील लोक एकमेकांसमोर ठाकले आहेत. पण, येथे कोणी भीष्म, कृृृपाचार्य, द्रोणाचार्य दिसत नाहीत. हरुन-अल-रशीद यांचे पात्र महाभारतात नव्याने उद्याला आले आहे. फडणवीसांनी शिंदे यांना भेटायला जाताना दाढी-मिश्यासुद्धा लावल्या असाव्यात. हे सर्व रहस्य त्यांच्या पत्नीने फोडले नसते, तर महाराष्ट्राला या महान कलावंताची ओळखच झाली नसती, असा टीकेचा भडीमार शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आला आहे.
दरम्यान, भाजप नेते आणि आमदार, शिंदेंच्या बंडामागे आमचा हात नाही असे म्हणत होते. ते आता उघड झाले आहे. पंतप्रधान मोदी हे कपड्यांचे आणि रुप पालटून फिरण्याचे शौकीन आहेत, पण फडणवीसही आता तेच करु लागले आहेत, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.
थोडक्यात बातम्या –
बळीराजाच्या सुखासाठी मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं, पंढरपूरच्या विकासाबाबत केली महत्त्वाची घोषणा
आलियाच्या प्रेग्नंसीबाबत करण जोहरने केला मोठा खुलासा!
अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा हाॅट अंदाज; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस
“शिवसेनेत दोनच माणसं शिल्लक राहणार आहेत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे”
Comments are closed.