‘ज्या चार लोकांच्या नावानं बोटं मोडता, त्या चार लोकांंमुळेच…’, संजय राऊत कडाडले
मुंबई | विधानसभेत गेले दोन दिवस विशेष अधिवेशन सुरु होते. त्यात विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची 164 मतांनी निवड झाली. तसेच विश्वासदर्शक प्रस्तावावर देखील मतदान झाले. त्यात देखील 164 मतेच पडून भाजप व शिंदे गट विजयी झाला. विधानसभा विरोधीपक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड झाली. त्यांच्या अभिनंदनाच्या भाषणात अनेकांनी भाषणे दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह अनेकांनी भाषण करत शिवसेनेला धारेवर धरलं.
आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी कालच्या भाषणांचा समाचार घेतला. राऊत म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील त्यांनी जनतेची कामे केली पाहीजेत. ज्या चार लोकांच्या नावे बोटं मोडता, त्या चार लोकांंमुळे तुम्हाला सत्ता मिळाली. ते चार लोक पक्षाचं काम करत होते, आजही करत आहेत, गेली अडीच वर्षे तुम्ही सत्तेत राहीलात, तेव्हा हे चार लोकंच होते. आता त्यांना तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात. पण उद्धव ठाकरे काय दुधखुळे नाही आहेत, ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. ते स्वत: चे निर्णय स्वत: घेतात.
मी काल प्रवासात होतो म्हणून शिंदेंचे भाषण ऐकता आले नाही, पण मी आता वाचले आहे. मुख्यमंत्र्यांनी ठराव जिंकला की त्यांना भुमिका मांडायची असते, त्यांनी राज्याच्या हितासाठी काय करणार? हे सांगायचे सोडून पक्ष का सोडला याचा खुलासा देत होते. राणे आणि भुजबळ यांची भाषणे देखील अशीच होती असे राऊत म्हणाले. पक्ष सोडून दुसऱ्या गटात गेले की, असेच खुलासे करावे लागतात. माझ्यावर कसा अन्याय झाला, मीच कसा बरोबर आहे, हे सांगावं लागते. लोकांच्या भावनेला हात घालावा लागतो. तो कालच्या भाषणात शिंदेंना उत्तम जमला, असा टोला राऊतांनी लगावला.
दरम्यान, गुलाबराव पाटलांनी काल संजय राऊत हे आम्हाला डुक्कर म्हणतात असे म्हटले. तसेच लायकी नसताना आमच्या मतांवर खासदार झाले आणि मनाला वाटेल ते आम्हाला बोलतात असेही म्हणाले होते. उद्धव ठाकरे साधे आहेत पण त्यांच्या भोवती कोंडाळ जमलेले आहेत त्यांनी त्यांना बावळत ठरविले, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
‘शरद पवार म्हणजे काही…’, केतकी चितळे स्पष्टच बोलली
‘एखाद्या सांगाड्यासारखं हे सरकार भाजपच्या रुग्णवाहिकेतून अवतरलं आहे’, शिवसेनेचा घणाघात
‘हिंमत असेल तर…’, उद्धव ठाकरेंचं शिंदे सरकारला आव्हान
तुमच्याकडे असणाऱ्या ‘या’ नोटा बाद होणार, RBI चा मोठा निर्णय
‘…तरीही माझ्यातला शिवसैनिक जिवंत असेल’, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
Comments are closed.