“थोडी तरी लाज असेल तर नरेंद्र मोदींनी..”; काश्मीरमधील हल्ल्याप्रकरणी संजय राऊत संतापले

Sanjay Raut | जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा हिंसक परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे दहशतवादी हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. आता जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. यामध्ये भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले.

या घटनेनंतर देशभरात शोक व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत हल्लाबोल केलाय.

“नरेंद्र मोदींनी अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा”

“मोदींनी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून ते आजपर्यंत जवळपास 40 जवानांच्या हत्या झाल्या आहेत. त्यांचं बलिदान आहे मला मान्य आहे, पण मी त्यांना हत्या म्हणतोय. देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या हत्यांना जबाबदार आहेत.”, असा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय.

तसंच थोडी जरी लाज, चाड असेल, नैतिकता असेल तर नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे. गृहमंत्री हे सपशेल अपयशी ठरले आहेत, असा संताप देखील यावेळी राऊत यांनी व्यक्त केला.

“काश्मिरात अतिरेक्यांनी धूमाकूळ, इकडे गृहमंत्री..”

पुढे ते म्हणले की, “मोदींनी ज्या दिवशी पंतप्रधान पदाची शपथ घेतली,त्याचवेळी काश्मीरमध्ये हल्ला झाला. तीच विटी, तोच दांडू, तेच गृहमंत्री. जे आधी 5 वर्ष पूर्णपणे अपयशी ठरले. तेच संरक्षणमंत्री, राजनाथ सिंह , त्यांच्याकडून ठोस कारवाई झाली नाही. जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी धूमाकूळ घातलाय आणि गृहमंत्री अमित शाह हे फक्त हात चोळत बसले आहे.”

“गृहमंत्री शाह यांनी जितकी ताकद राजकीय विरोधकांना खतम करण्यात लावली, तीच ताकद जर जम्मू-काश्मीरमध्ये, मणिपूरमध्ये देशाच्या शत्रूंना संपवण्यासाठी लावली असती तर आज या जवानांच्या हत्या पाहण्याची वेळ आली नसती.”, असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

News Title –  Sanjay Raut Slams PM Modi After Terrorist Attack In Jammu Kashmir

महत्त्वाच्या बातम्या-

‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठीही योजना; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

अशा महिलांपासून राहा लांब, नाहीतर व्हाल बर्बाद

प्रशिक्षक होताच गौतम गंभीरची विराट आणि रोहितला तंबी, म्हणाला…

IAS पूजा खेडकर यांची 3 तास पोलीस चौकशी, धक्कादायक माहिती समोर

मोठी बातमी! निवडणुकीनंतर पहिल्यांदा सुनेत्रा पवार दिसल्या शरद पवारांच्या मोदीबागेत