बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्याच्या राजकारणात एक दुजे के लिए सिनेमा सुरु”

मुंबई | महाविकास आघाडी सरकार (MVA) पाडून शिवसेनेचे बंडखोर नेते आणि माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याच्या शपथविधीला आता पंधरवडा उलटून गेला तरी एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होत नाही आहे. त्यावर आता विरोधी पक्ष त्यांच्यावर टीका करत आहे.

गेल्या 56 वर्षात शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले आहेत आणि हा इतिहास आहे. इतिहास बदलण्याची ताकद या गटात नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे. मंत्र्यांची नियुक्ती होऊ शकत नाही. खातेवाटप केले जात नाही. एक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. राजकारणात एक दुजे के लिए हा नवा सिनेमा सुरु आहे. महाराष्ट्रात एक दुजे के लिए सिनेमा सुरु आहे आणि त्याचा राजकीय अंत सुद्धा त्याप्रमाणे होईल. या सर्व बंडखोर आमदारांनी राजकीय आत्महत्या केलेल्या आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

तसेच यावेळी त्यांनी भारतीय संसदेच्या नवीन शब्दकोशावर देखील भाष्य केलं. संसदेतील आंदोलनांना बंदी घालणं आणि देशातील लोकप्रतिनिधी कडक आणि स्पष्ट शब्दांत जर सरकारला प्रश्न विचारत असतील तर त्यांची मुस्कटदाबी करण्यात येत असेल तर या देशात लोकशाही आहे का नाही?, असा प्रश्न निर्माण होतो. आणीबाणी असो किंवा अशा प्रकारची मुस्कटदाबी असो. जनतेला आणि लोकप्रतिनिधींना आवाज उठवण्याचा अधिकार आहे. केंद्र सरकार जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा गळा घोटत आहे, असं राऊत म्हणाले.

यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांचा देखील समाचार घेतला. बेईमान हा शेवट पर्यंत बेईमान नाही हे सांगत असतो. तुम्ही शिवसेना सोडली आहे, तर तुम्ही तुमचा स्वतंत्र पक्ष स्थापन करा. तुमचे स्वतंत्र स्थान निर्माण करा, असं आव्हान देखील त्यांनी यावेळी केलं.

थोडक्यात बातम्या – 

“दोन वाडपे व्यवस्थित वाढत असतील तर 40 जणांची काय गरज”

“सत्ता असो वा नसो बारामतीचा विकास थांबणार नाही”

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंकडून आणखी एका बड्या नेत्याची हकालपट्टी

“शिवसेनेच्या 40 आमदारांना मनसेमध्ये घेण्यासाठी फडणवीस-ठाकरे भेट?”

मोठी बातमी! SBI चा ग्राहकांना मोठा झटका, आता…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More