‘ते आमचे सहकारी नाहीत, ते मनाने आणि धनाने…’, संजय राऊतांची बोचरी टीका
मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेेनाप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केेली. सोमय्या ठाकरेंना माफिया म्हणाले तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकारला माफियाराज म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि आताचा शिंदे गट हे सोमय्यांवर संतापले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या बद्दल चुकीचं एकूण घेणार नाही, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, हे त्यांचे डावपेच आहेत. लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी हे सर्व सुरु आहे. ते लोक शिवसेनेत नाहीत, त्यांनी विधीमंडळात शिवसेनेचा वेगळा गट स्थापन केला होता. पण शिवसेनेशिवाय त्यांचे अस्तित्व नाही, असं राऊत म्हणाले.
शिंदे गटाचे आमदार शिवसेनेचे नाही, ते भाजपमध्ये तनाने विलीण झाले आहेत, मनाने विलीन झाले आहेत, धनाने तर कधीच झालेत. ते आमचे सहकारी होते. आता ते आमचे सहकारी नाहीत, त्यांनी असे खेळ करु नयेत, असा इशारा राऊतांनी दिला. तसेच हिंमत असेल तर शिवसेना सोडल्याचं जाहीर करा, असंही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. तेथे पत्रकारांशी बोलत होते. शिंदे गटाच्या आमदारांना शिवसेनेत रहायचं नाही, हे आता स्पष्ट झालं आहे मग आता लोकांंमध्ये भ्रम पसरवण्याचं काम आता करु नका. तुम्ही जर शिवसेना सोडली तर तुमची आमदारकी जाईल. मी शिवसेनेचा आमदार नाही असं जाहीर करुन राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक लढवून आमदार व्हावं असं थेट आव्हान राऊतांनी बंडखोर आमदारांना केलं आहे.
थोडक्यात बातम्या –
राज्यातील ‘या’ भागांना पाऊस झोडपून काढणार; अति मुसळधार पावसाची शक्यता
आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ; जगनमोहन रेड्डींच्या आई विजयलक्ष्मींचा लेकाच्या पक्षाला रामराम
शिंदे सरकारचा उद्धव ठाकरेंना झटका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“शिवसेना पुन्हा कधीच उभी रहाणार नाही, शिवसेनेेची आजची अवस्था ठाकरे पिता-पुत्रामुळेच”
अमरनाथ ढगफुटीतील मृतांचा आकडा वाढला, महत्त्वाची माहिती समोर
Comments are closed.