बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसनं आधी गोंधळातून बाहेर यावं – संजय राऊत

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी स्वबळाची भाषा केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या. काँग्रेसच्या स्वबळावरून शिवसेना विरुद्ध काँग्रेस असं वाक् युद्ध रंगताना पाहायला मिळत आहे.

शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन काल पार पडला. यादरम्यान, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना स्वबळाची भाषा करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं. पण याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारणा केली असता उद्धव ठाकरे जे बोलले ते नेमकं कोणाला उद्देशून बोलले हे स्पष्ट झाल्यानंतर यावर प्रतिक्रिया देऊ, असं मत व्यक्त केलं.

यासंबंधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आधी गोंधळातून बाहेर यावं आणि मग काय तो निर्णय घ्यावा, असं म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं दिसून येत आहेत.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार का? याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी या विषयावर भाष्य करणं टाळलं, तसेच योग्य वेळ आल्यावर यावर बोलू, असं स्पष्टीकरण दिलं आहे. त्याबरोबरच शिवसेना कोणत्याही लढाईसाठी तयार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.

थोडक्यात बातम्या –

‘या’ महापालिकेतील तब्बल 1300 कर्मचारी कोरोनाबाधित; 27 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांची प्रकृती नाजूक; डॉक्टर म्हणतात…

पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांची कडेकोट नाकाबंदी

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल करा; पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आक्रमक

लसीकरण केल्यानंतर कोरोना होणार का?; संशोधनातून ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More