Sanjay Raut l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पोलीस अधिकाऱ्यांसंदर्भात एक मोठा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
अंडरवर्ल्डच्या मदतीने निवडणूक लढवली जात आहे :
संदर्भांत अधिक माहिती अशी की, माणसे अध्यक्ष राज ठाकरे जिथे भाषण करुन गेले आहेत तिथे अंडरवर्ल्डच्या मदतीने निवडणूक लढवली जात आहे. तसेच मुंबईतल्या अनेक मतदारसंघात ठाण्यात व पुण्यात अनेक नामचीन गुन्हेगार ज्यांचा कधीकाळी अंडरवर्ल्ड टोळ्यात सहभाग होता. तसेच मी त्यांची नाव देखील देऊ शकतो असे अनेक असे गुंड देखील आहेत. त्यामुळे मी त्यांचं नाव देखील देईन.
कोणत्या अधिकाऱ्यांना कोणत्या गुंडांना मदत करण्यासाठी वर्षावरुन काय सूचना येत आहेत, हे सत्यनारायण चौधरीं इतकं कोणाला देखील माहित नाही. त्यामुळे तुम्ही कोणासाठी काम करताय? मी नाव देऊ का तुम्हाला मिस्टर चौधरी? त्यामुळे मला धमक्या देऊ नका. मुंबई-महाराष्ट्रात काय चालल आहे? हे गुंडांच्या मदतीने निवडणूक लढवू इच्छित आहेत.
Sanjay Raut l पोलीस अधिकारी आणि गुंडांच्या रात्री बैठका होतात :
याशिवाय आम्ही राजकीय पक्ष निरीक्षक, संपर्कप्रमुख देखील नेमतो, तशा या गुंड टोळ्यांच्या मोहोरक्यांवर विधानसभेची जबाबदारी देखील दिली आहे असं गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच कांजूरमार्ग, भांडूप, दादर विक्रोळी व ठाणे शहर असेल या ठिकाणी ठरवून गुंड देखील घेण्यात आले आहेत.
यासोबतच काही लोकांचा त्यासाठी जामिन करुन घेतला जात आहे. त्यामुळे अनेकांना पक्षात घेतल आहे. याशिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुंडांच्या रात्री रीतसर बैठका देखील होतात असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
News Title – Sanjay Raut speaks on law & order situation in maharashtra
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ तारखेनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढणार; IMD कडून महत्वाचा इशारा
सोन्याला पुन्हा झळाळी, ‘इतकी’ झाली दरवाढ; जाणून घ्या आजचे दर
नोव्हेंबर महिना ‘या’ राशींसाठी ठरणार भाग्याचा; शनीदेव करणार मालामाल
अमित शाह यांचं शिवरायांबद्दल पुन्हा वादग्रस्त विधान; म्हणाले, ‘गुलामीच्या काळात..’
देवेंद्र फडणवीस होणार पुढील मुख्यमंत्री?, अमित शाह यांनी दिले मोठे संकेत