बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संभाजीराजेंना पाठींबा देण्याबाबत संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणतात…

मुंबई | सध्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होत आहेत. त्यातील दोन जागा शिवसेना लढवत आहे. या दोन्ही ठिकाणी आम्ही शिवसेनेचे उमेदवार देऊ आणि दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आणू, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.

कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ज्याअर्थी एखादा उमेदवार मी लढणार असं जाहीर करतो, तेव्हा त्यांनी निवडून येण्यासाठी लागणाऱ्या मतांची बेरीज केलेली असते, असं राऊत म्हणालेत.

आमचा संभाजीराजेंना विरोध नसल्याचंही राऊत म्हणाले. मला बाकी काही माहिती नाही पण शिवसेनेच्या दोन जागा निवडून येणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज लागते. त्या मतांची जमवाजमव संभाजीराजेंनी केली असेल, असंही ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

Weather Update | पुढील 5 दिवस ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

“बहिण म्हणून सांगते वसंत भाऊ एकदा काय तो…”

सर्वसामान्यांना दिलासा; ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“राजे ठाकरेंनी अयोध्येत यावं अशी रामाचीच इच्छा नाही”

“राज ठाकरेंवर उपचार करण्याची गरज, एखाद्या चांगल्या काऊन्सिलरकडे त्यांनी दाखवावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More