‘शरद पवारांनी ते कांड केलं…’; संजय राऊत स्पष्टच बोलले

मुंबई | 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) आणि अजित पवार(Ajit Pawar) यांचा झालेला पहाटेचा शपथविधी आजपर्यंत महाराष्ट्राची जनता विसरू शकली नाही. आता याच पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला. या सरकारला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांची संमती होती, असं फडणवीसांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रया दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

अडीच-तीन वर्ष झाली आता त्या शपथविधीला. शरद पवार यांचा त्यात काहीही संबंध नाही. शरद पवारांनी ते कांड केलं असतं तर सरकार पाच वर्ष टिकलं असतं. त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एकही आमदार भाजपला फोडता आला नाही, असं त्यांनी म्हटलंय.

भाजपने सर्वात आधी शिवसेनेशी विश्वासघात केला. त्यावेळी शरद पवार जर तुमच्या षडयंत्रात सामील असते, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने पाच वर्ष पूर्ण केलं असतं. शरद पवार आपल्या शब्दांचे पक्के असून ते हाती घेतलेले काम पूर्ण करतात, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

दरम्यान, अडीच वर्षांनंतरही देवेंद्र फडणवीस तेच सकाळचे स्वप्न पाहत आहेत. अजूनही ते झोपेतून उठले नाहीत. शपथविधी सोहळा होतोय, ते मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत, असे स्वप्न कधीपर्यंत पाहणार? हे दळण आणखी किती काळ दळत राहणार?, असा सवाल त्यांनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या-