“तात्यांचं शेवटचं स्टेशन हे मातोश्री..”; वसंत मोरेंच्या पक्ष प्रवेशावर संजय राऊतांचं वक्तव्य

Sanjay Raut | फायरब्रँड नेते वसंत मोरे हे लोकसभा निवडणुकीआधी मनसे पक्षात होते. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी या पक्षात पक्षप्रवेश केला. मात्र त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अशातच आता वसंत मोरेंनी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वसंत मोरेंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

“तात्यांचं शेवटचं स्टेशन हे मातोश्री असणार”

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वसंत मोरेंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. “खूप दिवसांनी पाऊस झाला आणि वसंत फुलला. आता आगे बढो नको, ते आहेत तिथेच थांबू द्या. ते खूपच पुढे आले आहेत. आणि मातोश्रीवर पोहोचले आहेत. मी वसंत तात्यांचं स्वागत करतो.  तात्या लोकसभेला लढले. त्यानंतर तात्या काय करणार? त्यानंतर तात्यांचं शेवटचं स्टेशन हे मातोश्री असणार,” असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

पुढे राऊत म्हणाले की, ” तात्यांची सुरूवात ही शिवसेनेतून झाली आहे. ते अधेमधे कुठेही गेले असले तरीही तात्या मूळचे शिवसैनिक आहेत आणि तो शिवसैनिक मातोश्रीच्या मंदिरात दाखल झालेला आहे. शिवसेना परिसरात तात्या आल्याने पुणे, खडकवासला आणि आसपासच्या परिसरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. उद्धव ठाकरेंना एक मजबूत कार्यकर्ता मिळाला आहे,” असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

आपण सर्वांनी मिळून पुणे शहरातील शिवसेना वाढवण्याचं काम करूया. तात्यांसोबत असंख्य कार्यकर्ते आलेले आहेत. अनेक पदाधिकारी आलेले आहेत. त्या सर्वांना शिवसेनेत पदाधिकारी आलेत आणि त्यांना शिवसेनेत घेताना आम्हाला आनंद होत आहे. आपण सर्वजण स्वगृही परतल्याचं मानतो, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

वसंत मोरेंसह पदाधिकाऱ्यांनी बांधलं शिवबंधन

वसंत मोरे यांच्यासह मनसे 17 शाखाध्यक्ष, 5 उपविभागाध्यक्ष, 1 शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, माथाडी कामगार ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेना पुणे शहरात वाढवण्यासाठी आता सोपं होणार आहे.

नुकतीच पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मनसे पक्षातून वसंत मोरे बाहेर पडले. त्यांना वंचित बहुजन आघाडी पक्षातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर होते. तर भाजपचे मुरलीधर मोहोळ देखील होते. या तिहेरी लढतीत भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी विजय मिळवला. त्यानंतर आता पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी पक्षाला राम राम करत वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

News Title – Sanjay Raut statement after Vasant More Enter   Shivsena Thackeray Group

महत्त्वाच्या बातम्या

सोन्याने घेतली पुन्हा भरारी, काय आहेत आजचे दर?

वरळी हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट समोर; मुख्य आरोपीला पोलिसांनी..

अखेर वसंत मोरेंनी बांधलं शिवबंधन; पक्षप्रवेश होताच उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी

खरेदीची करा घाई! Maruti Suzuki च्या ‘या’ गाड्यांवर मिळतंय तगडं डिस्काऊंट

“..तर राज्यात तिसरी आघाडी निश्चित”; बच्चू कडू यांचे महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत