1500 रूपयांमध्ये लाडक्या बहिणीचं घर चालेल का?, संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील महिलांना महिना 1500 रूपये देण्यात येणार आहेत असं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे. लाडक्या भावांना 6 हजार ते 10,000 रूपये महिना देण्यात येणार आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

“1500 रुपयांमध्ये लाडक्या बहिणीचं घर चालणार कसं?”

लाडक्या भावाला 10,000 हजार रूपये आणि लाडक्या बहिणीला केवळ 1500 रूपये? लाडक्या बहिणीला देखील 10,000 रूपये द्या, तरच त्यांचं घर चालतं. 1500 रुपयांमध्ये लाडक्या बहिणीचं घर चालणार कसं?, अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारच्या योजनेवर कडाडून टीका केली आहे.

खरी गरज ही लाडक्या बहिणींना आहे. त्या घर चालवत असतात. अनेकींच्या घरात नवरा, भाऊ बेरोजगार आहेत.  आज एअर इंडियाच्या कार्यालयासमोर 2000 लोडरच्या जागा भरण्यासाठी 25000 सुशिक्षित तरूणांची झुंबड उडाली असून महाराष्ट्राची परिस्थिती आहे, हे सगळे लाडके भाऊ आहेत. त्यांच्या खात्यात दहा-दहा हजार रूपये द्या आणि लाडक्या बहिणींच्या खात्यातही दहा-दहा हजार रूपये द्या, लाडक्या भावाला देखील दहा हजार रूपये द्या, यामुळे राज्यात स्री-पुरूष समानता आहे हे दाखवून द्या, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

तसेच यावेळी संजय राऊत यांनी छनग भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले की, शरद पवार हे नटसम्राट आहेत आणि छगन भुजबळ हे फिरत्या रंगमंचावरील कलाकार आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. छगन भुजबळ हे मोठे कलाकार आहेत. त्यांनी चित्रपटात काम केलं आहे. खूप वेगळा रंग बदलून एक नाट्य निर्माण छगन भुजबळ माहीर आहेत. छगन भुजबळ का गेले? कसे गेले? त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणात कसा हंगामा झाला हे सर्वांनी पाहिलं असेल, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

“छगन भुजबळ सारखे नेते हे फिरत्या रंगमंचावरील कलाकार”

शरद पवार हे नटसम्राट आहेत. त्यांना देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रतिष्ठा आहे. महाराष्ट्रात एक खुला मंच आहे. ते फिरत आहेत. छगन भुजबळ सारखे नेते हे फिरत्या रंगमंचावरील कलाकार आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

त्यानंतर संजय राऊत यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं आहे. राज्यात आम्ही 31 जागांवर विजयी झालो. महायुती आम्हाला 10 देखील जागा विजयी होणार नाही असं म्हणाली होती. विधानसभा निवडणुकीत संजय राऊत यांनी 280 जागांवर विजय मिळवू असा विश्वास व्यक्त केला आहे.

News Title – Sanjay Raut Statement On Eknath Shinde About Ladka Bhau yojana Scheme

महत्त्वाच्या बातम्या

“छगन भुजबळ राजकारणातील फिरता रंगमंच, ते नाट्य देखील निर्माण करतात”

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेला जोर; अभिषेकच्या ‘त्या’ कृतीने सगळ्यांनाच धक्का

आज ‘या’ राशींच्या व्यक्तींना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता!

भाजप नेत्याचं मुस्लिमांबाबत वादग्रस्त वक्तव्य; राजकारण पेटलं

मुंबईसाठी पुढील काही तास धोक्याचे?, हवामान विभागाचा मोठा इशारा